ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या जन्माची निर्मिती करता. तुमचे भाव तुम्हाला जन्ममृत्युच्या चक्रात अडकवतात ."
पुष्प ३१ पुढे सुरु
त्यावेळी, स्वामी माझ्या प्रत्येक दैनंदिनीला नाव देत असत. या डायरीचे नाव होते, ' आत्मसाक्षात्काराने काठोकाठ भरलेली...' माझी सात चक्रे उघडून नवनिर्मिती होते. या नवनिर्मितीमध्ये स्वामी व मी सर्वव्याप्त होतो . ही अमृत निर्मिती आहे . जीव आत्मसाक्षात्काराने ओतप्रोत भरल्याने अमृत स्त्रवते; आणि विश्वातील सर्वांना आत्मसाक्षात्कार प्रदान करते . ही पूर्ण डायरी स्वामींबरोबरच्या अनेक अनुभवांनी भरलेली आहे . रात्रंदिवस स्वामींसाठी अश्रू ढळत मी झोपूही शकत नव्हते , केवळ ज्ञान व अनुभव याद्वारे आपण परमेश्वर प्राप्त करू शकतो . अहंकाराचे समूळ उच्चाटन ही ज्ञानाची पहिली पायरी आहे.
१६ मे २०१३
आज सकाळी मी उठल्यानंतर मच्छरदाणी काढण्यासाठी विमला व फ्रेड माझ्या खोलीत आले . ते मच्छरदाणी काढत असताना स्वामींचा फोटो, पादुका व माझी चंदनाची माळ मी हातात धरली होती . त्यांचे काम झाल्यानंतर मी फोटो खाली ठेवला व त्याला चंदनाची माळ घातली. माझ्या लक्षात आले की तेथे एकच पादुका होती . मी न् विमलने सगळीकडे शोधले , परंतु व्यर्थ . अचानक आमचे लक्ष स्वामींच्या फोटोकडे गेले . पादुका जपमाळेत गुंतली होती . फ्रेडने फोटो काढला . एडी व अमरही खोलीत आले . सर्वांनी हे पाहिले . अभिषेकानंतर मी फोटो बाहेर आणला ; पादुका आहे त्या स्थितीतच होती . त्या फोटोवर स्वामी अमृत देतात म्हणून मी माळ काळजीपूर्वक काढून दुसऱ्या फोटोवर घातली . पादुका खाली न पडता आहे तशीच होती . ही माळ चंदनाच्या मण्यांची आहे . माझा देहही चंदनासारखा आहे. विश्वकल्याणासाठी मी माझा देह झिजवते आहे. स्वामींच्या पादुका सदैव माझ्यासोबत असतात, हे यावरून निर्देशित होते .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ......
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा