ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" आपल्या अतृप्त इच्छा, आकांक्षा व आसक्ती पुढील जन्मात आपल्या बरोबर असतात ."
पुष्प ३२ पुढे सुरु
अशा तऱ्हेने मानवी शक्तीचा ऱ्हास झाला आहे . त्याने जेथे जायला हवे तेथे तो जाऊ शकत नाही . म्हणून आपण यांवर नियंत्रण ठेवून सर्वकाही ईश्वराभिमुख करावे . असे केल्याने ज्ञानोदय होतो. मनुष्यातील स्वल्प ' मी ' ला अनेक गोष्टींची हाव असते . जन्मापासून मृत्यूपर्यंत माणसाला सतत काही ना काहीतरी हवे असते . जेव्हा इंद्रिये अनेकविध इच्छांकडे वळतात तेव्हा तो अहंकार बनतो . आणि जेव्हा इंद्रियनिग्रह करून त्यांना ईश्वराभिमुख केले जाते तेव्हा ते ज्ञानात परिवर्तित होते . ' मी ' भौतिक गोष्टींकडे वळल्याने अनेक दुर्गुण मागोमाग येतात . अतृप्त इच्छांमुळे क्रोध जन्मतो तर इच्छातृप्तीमुळे लालसा जन्मते . एक इच्छा पूर्ण होता होता पाठोपाठ दुसरी प्रतिक्षेत असते . सर्व इच्छा एकामागोमाग एक रांगेत उभ्या असतात . जो यांवर ताबा मिळवून भगवंतावर मन एकाग्र करतो तो स्वामी बनतो . अनेक इच्छांचा पाठपुरावा केल्याने अनेक दुर्गुण येतात व तो ' मी ' चा गुलाम होतो . हा ' मी ' तुम्हाला गुलाम बनवून तुमच्या देहातील सर्व शक्ती हिरावतो . शास्त्रज्ञ या शक्तीद्वारे चंद्रावर जाण्याचा मार्ग शोधतात ! तथापि संतमहात्मे या शक्तीचा वापर करून चंद्रसुर्यादींचा निर्माता अशा भगवंताप्रत पोहोचण्याचा मार्ग शोधतात.
निर्मितीवर मालकी मिळविण्याचा प्रयत्न करणे व्यर्थ आहे. त्याऐवजी निर्मात्यालाच आपलेसे करा ! ' मी ', मत्सर , क्रोध आणि विवादामुळे हे येते . अहंकारातून विवाद उभे राहतात . जर एकादी व्यक्ती तुमच्याशी वाद घालत असेल तर शांत रहा वा तेथून निघून जा . चिंतन करा . जर दोष तुमचा असेल तर तुम्ही स्वतःचा दोष सुधारा . वाद घालणाऱ्या व्यक्तीचा दोष असल्यास त्यांचे प्रारब्ध असा विचार करून सोडून द्या . झालं गेलं विसरून जा .
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा