ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
पुष्प ३५ पुढे सुरु
आज सकाळी आम्ही विश्व ब्रम्ह कोटममध्ये जात असताना फ्रेडने मंडपाच्या खाली डाव्या पायाची पाऊलखुण दाखवली. पाणी वा तेल यांने बनलेली पाऊलखुण अगदी स्पष्ट दिसत होती. तेथे पूर्ण पाय नसून पायाची बोटे व पायाचा पुढील भाग एवढेच दिसत होते जणुकाही कोणी पाऊल पुढे टाकण्यासाठी तयार आहे ! दुसऱ्या दिवशी आम्ही ' जर परमेश्वराने चूक केली तर तो ही पुनर्जन्म घेतो ' ही वसंतामृतमाला प्रकाशित केली. जेव्हा मी स्वामींना पाऊलखुणेविषयी विचारले तेव्हा ते म्हणाले,
" मी त्रिविक्रम अवताराप्रमाणे येत आहे. मी संपूर्ण विश्वाला एका छताखाली आणणार आहे. "
अशा प्रकारे स्वामींनी त्यांचा डावा पाय पृथ्वीवर ठेवला आहे व उजव्या पायांनी ते संपूर्ण पृथ्वीचे मोजमाप करत आहेत. म्हणून तेथे डावा पाय केवळ अर्धाच दिसतो आहे . या वसंतामृतमालेत मी जे काही लिहिले त्याचे हे प्रत्यक्ष प्रमाण आहे. विश्व ब्रम्ह गर्भकोटममधून स्वामींचे भाव उद् भवतील व संपूर्ण विश्वाला एका छताखाली आणतील.
जय साईराम
व्ही.एस.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा