ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" आसक्ती विरहीत प्रेम दिव्य असून ते परमेश्वराचेच रूप आहे. "
पुष्प ३६ पुढे सुरु
२१ मे २०१३
वसंता - स्वामी, मी भीष्मानविषयी लिहू का ?
स्वामी - हो, तू लिही ? जर एखादी महान व्यक्ति तिच्या डोळ्यासमोर अधर्म घडत असलेला पाहून काही करत नसेल तर ते महापाप आहे. कृष्णानी सांगितले आहे की छोट्याशा चुकीचेही परिणाम भोगावे लागतात. प्रत्येकाला त्याच्या कर्माचे परिणाम भोगावेच लागतात. चांगल्या कर्माचे परिणाम चांगले तर वाईट कर्माचे परिणाम वाईट होतात. मी त्यांना हे प्रकरण मिटवून टाकण्यास सांगितले होते. परंतु पुन्हा पुन्हा त्यांनी चुका केल्या. तुझे पहिले पुस्तक मी त्यांना पुस्तकांच्या दुकानात ठेवण्यास सांगितले होते परंतु त्यांनी ते ठेवले नाही. जेव्हा एखादा परमेश्वराशी संबंधित गोष्टीबाबत चूक करतो तेव्हा त्या परिणामांची मात्रा अत्यंत तीव्र आणि गंभीर असते.
वसंता - हे सगळ कैकयीसारखं आहे का ?
स्वामी - कैकयी रामाच्या कुटुंबातील एक सदस्य होती. ते सर्वजण अवतार कार्यासाठी आले होते. त्याचप्रमाणे तुझ्या कुटुंबातील सर्वजण अवतार कार्यासाठी आले आहेत. हे लोक वेगळे आहेत.
वसंता - आता मला समजले, स्वामी.
ध्यान समाप्ती
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा