ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" जर तुम्हाला परमेश्वराबरोबर संभाषण करायचे असेल, त्याचा आवाज ऐकायचा असेल तर केवळ भाव महत्वाचे आहेत. "
पुष्प ३६ पुढे सुरु
आता आपण पाहू या. भीष्म शरशय्येवर असताना कृष्ण पांडवांना घेऊन त्यांना भेटायला गेले. भीष्मांनी त्यांना सदाचरण आणि राजाची धर्मसंहिता यांची शिकवण दिली. त्यावेळी द्रौपदी तेथे आली आणि हसली. धर्मराजाने तिला हसण्याचे कारण विचारले ती म्हणाली, " कौरवांनी धर्म मार्ग आचरला नाही. त्यांनी कौरवांना धर्म संहितेची शिकवण दिली नाही का ? सदैव धर्माचे पालन करणाऱ्या पांडवांना ते का शिकवण देत आहेत ?"
त्यावर कृष्णाने सांगितले, " जेव्हा कौरवांच्या राजसभेत द्रौपदीची विटंबना केली जात होती तेव्हा भीष्म, द्रोणाचार्य आणि कृपाचार्य काही न करता केवळ पाहत राहिले. तिच्यावर होणाऱ्या अन्यायाचा त्यांनी प्रतिकार केला नाही. समोर अधर्म घडत असताना काहीही न करता पाहत राहणे हे महापाप आहे. " स्वामींनीही हेच सांगितले की समोर अधर्म घडत असेल तर काहीही न करणे हे महापाप आहे.
भीष्म महाज्ञानी होते. विश्वासाठी ते सन्मार्ग दर्शक आहेत. त्यांनी सर्वसंग परित्याग केला. तथापि समोर अधर्म घडत असताना पाहत राहण्याची चूक त्यांनी केली. या कारणासाठी ते आता स्वर्ग लोकामध्ये फिरून कोठे अधर्म तर घडत नाही ना याची खातरजमा करतात. भीष्मांनी स्वामींना विचारले , " स्वामी , तुमच्या समोर अधर्म घडत असताना तुम्ही सुद्धा काही न करता पाहत राहिलात ना ? "
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा