ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" परमेश्वराची निर्मिती परस्परावलंबी आहे. निर्मितीत समतोल राखण्यासाठी आपण वापरत असलेल्या प्रत्येक गोष्टीची परतफेड केली पाहिजे."
पुष्प ४१ पुढे सुरु
….. हे सुमंगल माते, आमच्यासाठी प्रार्थना कर …..
ह्या मातेचे मांगल्य कसे वर्णावे ? तिच्या मनात उगम पावणारे सर्व विचार तसेच तिच्या मुखाने उच्चारलेले शब्द शुद्ध व सुमंगल आहेत. तिची प्रत्येक कृती मंगलदायक आहे. सामान्य मानवी जीवनात हे शक्य आहे का ? माझ्या मनात स्वामींशिवाय अन्य कोणतेही विचार नाहीत. मी केवळ स्वामींविषयी बोलते. माझी प्रत्येक कृती स्वामींप्रीत्यर्थ असते. माझ्या अवस्थेविषयी सांगणे जसे कठीण तसे समजून घेणेही कठीणच ! माझे मन, बुद्धि, इंद्रिय, अहंकार, जाणीव हे सर्व वशिष्ठ गुहेत स्वामींमध्ये विलीन झाले आहे. जेव्हा स्वामींचा अर्धा फोटो गुलाबी झाला तेव्हा " हा आपल्या ऐक्याचा पुरावा आहे " असे स्वामी म्हणाले. आता माझी काया उरली आहे. ही काया शुद्ध , सुमंगल करत तिचे ज्योतीमध्ये रुपांतर करून मी स्वामींच्या देहात विलीन होईन. हे माझ्या शुद्धतेचे व मांगल्याचे पुरावे आहेत.
….. हे पवित्र माते, आमच्यासाठी प्रार्थना कर …..
माझ्या पावित्र्यामुळे भूतलावर वैकुंठ निर्माण होते. ह्या कलियुगात भूतलाचे मी वैकुंठ कसे बरे करणार ? कृत, त्रेता वा व्दापार आदि युगांमध्ये कोणीही हे विश्व वैकुंठात परिवर्तीत केले नाही. असे असताना कलियुगात मला हे कसे साध्य होईल ? ह्या कारणासाठीच परमेश्वर अवतरला. मी स्वामींपासून जन्मले. आमच्या पावित्र्याद्वारे स्वामी व मी हे भूतल वैकुंठात रुपांतरीत करतोय. कलियुग मलीन आहे. मानवाच्या मानसिक प्रदुषणामुळे पृथ्वी दुषित झाली आहे. स्वामी व मी मिळून सर्वकाही मंगल व पवित्र करत आहोत. घरांत एकदा मृत्यू घडला तर १२ दिवसांनी पुरोहित येतात; धार्मिक संस्कार करून शुद्धी करतात. १२ व्या पर्यंत मंत्रपठण करत सर्व संस्कार संपवितात. १२ व्या दिवशी विशेष पूजा करून घरांत सर्वत्र कलशामधील पवित्र जल शिंपडून घराची शुद्धी करतात. अगदी असेच माझ्या संतत अश्रू सिंचनाने मी हे कलियुग रुपी गृह शुद्ध करते. युगानुयुगे संचित झालेली संस्कारांची ही घाण मी माझ्या अश्रूंनी धुवून काढत सर्व शुद्ध करत आहे.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा