ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" नैसर्गिक साधनसंपत्तीविषयी मनुष्याला असणाऱ्या लालसेपोटी निसर्गाचा समतोल बिघडला आहे ."
पुष्प ४१ पुढे सुरु
….. हे अबाधित माते, आमच्यासाठी प्रार्थना कर …..
' इतरांना दुखवू नका ' ह्या शब्दात स्वामींनी हे सांगितले आहे. माझ्या जीवनात याचे पालन कसे होते ते आपण पाहू. कोणालाही न दुखविण्याचा पाठ मी लहानपणापासूनच आचरणात आणला. मी प्रत्येकाकडून व प्रत्येक गोष्टीमधून चांगले तेच आत्मसात केले. कृतज्ञतेपोटी गुरुदक्षिणा म्हणून या सर्वांना मुक्ती प्रदान करण्यासाठी स्वामींकडे प्रार्थना केली. मी कधीही, कोणालाही काया, वाचा वा मनाने दुखविले नाही. सर्वांप्रती विनम्रता हा गुण माझ्यात जोपासला गेला. विनम्रता कशी येते ? विनम्रता ' मी विना मी ' या अवस्थेतून येते. जेथे ( अहंकार ) ' मी ' आहे तेथे इतरांप्रती क्रोध उत्पन्न होतो. क्रोधाची परिणती दुःखात होते. मला इतरांविषयी विचार करायला सवडच नाही; त्यांना मी दुखावेन कशी ? दिवसाचे २४ तास माझे मन केवळ स्वामींचाच विचार करते.
….. हे विमल माते, आमच्यासाठी प्रार्थना कर …..
घाण किंवा मळ म्हणजे काय ? हा मळ साबण व पाण्याने येणारा बाह्य मळ आहे कां ? नाही. ही आपल्या पंचेंद्रियांवर जमा झालेली अंतर्धूळ आहे. ही झटकून टाकून इंद्रियशुद्धी करायला हवी. अपशब्द उच्चारू नका. चांगले पहा व ऐका. स्वामी सांगतात, ' चांगले पहा, सत्कर्म करा, सत् प्रवृत्त व्हा. मन विमल करा. वाईट विचारंना थारा देऊ नका. जन्मानुजन्म मनावर साठलेली घाण साफ करून मन विमल करा.' घाम, कफ इत्यादी अंतर्गत मालिन्य साफ करण्यासाठी मी तप करते आहे. ही काया विमल करून परमेश्वराला अर्पण करणे माझे ध्येय आहे.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात …….
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा