ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" खऱ्या प्रेमाला देह अथवा विवाहाची आवश्यकता नसते केवळ भावना पुरेशा असतात."
पुष्प ४१ पुढे सुरु
..... हे प्रेममयी माते, आमच्यासाठी प्रार्थना कर .....
मैत्री म्हणजे काय ? मानवी नात्यांमध्ये मैत्रीचे स्थान सर्वोच्च आहे. मित्रांमध्ये कोणतीही गोष्ट गौप्य नसते. ते एकमेकांशी मोकळ्या मनाने बोलतात. पति आपल्या पत्नीला जे सांगू शकत नाही ते मित्रांजवळ मोकळेपणी बोलतो. माझ्या जीवनात कोणतीही गोष्ट गौप्य नाही. माझे जीवन म्हणजे एक खुले पुस्तक. आजवर मी कोणतीही गोष्ट कोणापासूनही लपवलेली नाही. मला कधी तशी गरज वाटलीच नाही. माझ्या जीवनाविषयी मी १२० हून अधिक पुस्तके लिहिली.
मला स्वामींनी ई-बुक्सही लिहायला सांगितले. ही पुस्तके जगभरातील वाचक वाचतात. ह्या पुस्तकांमधून मी माझ्या हृद्यवेदनांमधून उगम पावणारे भाव व्यक्त करते. वाचक व माझ्यामध्ये मैत्रभाव मानून मी हे लिखाण करते. मी परमेश्वरावर माझे सारे भाव वर्षिते. माझे रुदन, हास्य, माझा विलाप, माझी तळमळ असे विविध भाव ओतून मी वाचकांसाठी शब्दबद्ध करते. कोणतीही गोष्ट लपविणे माझ्या स्वभावातच नाही.
..... हे अलौकिक माते, आमच्यासाठी प्रार्थना कर .....
माझे जीवन अजब आहे. माझ्या जगावेगळ्या जीवनशैली विषयी जग अनभिज्ञ आहे. गत युगांत असे कधीही घडलेले नाही. या कलियुगात जन्म घेऊन मी क्लेशमय जीवन जगत आहे. भूतलावर पूर्वी कधीही जन्म घेतला नसल्यासारख्या मला यातना होत आहेत. मानवाबरोबर जीवन कसे जगावे हे मला माहीत नाही. त्यांच्याशी कसे वागावे हे मला कळत नाही. मला फक्त परमेश्वर हवा, हे जग नको असा विलाप मी अखंड करते. मला भुकेची भावना नाही. बालपणापासून शौचास जाताना मी रडत असे. शरीरातील त्याज्य घटक बाहेर टाकणे हे एक नैसर्गिक क्रिया असल्याचे माझ्या आजीने मला समजावले. सामान्य माणूस हे सहजतेने घेतो. मला देहाची घृणा वाटते. विष्ठेकडे पाहून आपल्याला किळस येते. तथापि ती शरीराच्या आत असते. हे टाळण्यासाठी ' अखंड उपवास हा एकच उपाय ' असा विचार करून मी वर्षभर सर्व खाण बंद केले. तेव्हा मी सकाळ व संध्याकाळ १ कप दुध घेत असे. त्यावेळी विश्व ब्रम्ह गर्भ कोटम् चे बांधकाम चालू होते. काही खात नसूनही आठवड्यातून एकदा मी शौचास जात होते. उपाशी असूनसुद्धा कडक उपवास करूनसुद्धा शौचास कां जावे लागते या विचाराने मी हैराण होत असे. सर्वजण माझी समजूत काढत. गर्भकोटमच्या च्या उद्घाटन समारंभानंतर स्वामींनी मला पुन्हा खाणे सुरु करावयास सांगितले. त्यांनी सांगितले की प्रथम एक चमचाभर दुध भात व नंतर २ चमचे दहीभात खावा. आतासुद्धा मी ४ चमच्याहून अधिक भात खाऊ शकत नाही. मी अशी सर्वांहून निराळी कां बरे ? मला या जगाची भीती वाटते, म्हणून स्वामींनी मला आश्रमवास सांगितला. इथे जगाशी काही संबंध येत नाही. माझे जीवन म्हणजे एक महद् आश्चर्यच !
उर्वरित वसंतामृत पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा