ॐ श्री साई वसंतसाई साय नमः
सुविचार
" मनुष्याने विवेकबुद्धीचे अनुसरण केल्यास पंचतत्वांमध्ये समन्वय राहील."
पुष्प ४१ पुढे सुरु
….. हे पतिव्रता माते, आमच्यासाठी प्रार्थना कर …..
माझ्या पातिव्रत्यामुळेच कलियुग सत्ययुगात बदलत आहे. पातिव्रत्य म्हणजे पत्नीचे पतिप्रति एकनिष्ट प्रेम. या देशांत अनेक महान पतिव्रता होऊन गेल्या. सावित्रीने यमाशी युक्तिवाद करून मृत पतीस संजीवन दिले. त्यामुळे ती एक महान पतिव्रता म्हणून ओळखली जाते. देह त्याग केलेल्या अवतारास मी परत आणत आहे. हे असामान्य पातिव्रत्य आहे. मी स्वामींना क्षणभरही विसरू शकत नाही. माझे पातिव्रत्य असे आहे.भगवान श्री कृष्णाने भगवत् गीतेत घोषित केले आहे की …
' ममैवांशो जीवलोके जीवभूतः यनातनः। '
सर्वजण परमेश्वराचा अंश म्हणून जन्मले आहेत, तथापि त्यांना ह्याचे विस्मरण झाले आहे. कलियुगातील मानवाने त्यांच्यामध्ये असणारा ईश्वरी अंश धुवून टाकला, तो पशुवत् जीवन जगत आहे. त्या मृत ईश्वरी अंशाला मी संजीवनी देते. मी साईंचा अंश परत आणत नाही तर त्यांना त्याच रुपात परत आणीन. माझ्या पातिव्रत्यामध्ये सर्वांना सत्यसाई करण्याचे सामर्थ्य आहे. मला स्वामींशिवाय अन्य काहीही पाहायचे नाही की बोलायचे ही नाही. मला कोणीही पाहू नये म्हणून मी तप करते आहे. सत्ययुगाचे आगमन ही फलश्रुती आहे. इथे केवळ आम्ही दोघं असू. माझ्या पातिव्रत्याचे स्पष्टीकरण अर्ध्या पानाच्या लिखाणांतून होणे नाही. हे समजण्यासाठी तुम्ही माझ्या सर्व पुस्तकांवरील लेखनावर सखोल चिंतन, मनन करायला हवे. कण्णगीच्या पतीची अन्यायाने हत्या झाल्यामुळे तिने मदुराई नगर बेचिराख केले. हे तिच्या पातिव्रत्याचे सामर्थ्य. सर्वांचा काम व कर्मांचा संहार करण्याची ताकद माझ्या पातिव्रत्यामध्ये आहे. हे कलिचा संहार करत नूतन सत्ययुग आणते. पातिव्रत्य म्हणजे नुसते पतीविषयी प्रेम दर्शविणे नव्हे तर पतीव्यतिरिक्त अन्य कोणत्याही गोष्टीत रुची नसणे. मला ह्या जगात स्वामींशिवाय अन्य कशातही स्वारस्य नाही.
उर्वरित वसंतामृत पुढील भागात ……
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा