गुरुवार, ११ फेब्रुवारी, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " साधनेच्या मार्गाद्वारे साधक अध्यात्मिक उंच उंच शिखरे पादाक्रांत करतो.   "

पुष्प ४७ पुढे सुरु 

                     आता आपण याविषयी पाहू . स्वामी आता म्हणतात ," आता तुझे शारीरिक क्लेश संपले . आता तू मुक्त पक्ष्यासारखी माझी प्रतिक्षा करते आहेस ." माझ्या हृद्यनिवासातून प्रेममार्गावर वाटचाल करत स्वामी भूतलावर अवतरतील . D म्हणजे descends  आणि e म्हणजे earth ( पृथ्वीवर अवतरतील ) ते पृथ्वीवर आले की मला त्यांच्याकडे बोलावतील. आम्ही सर्वजण तेथे जाऊ . हिल हाऊसमधील कॉटवर मी नेहमीप्रमाणे स्वामींचा फोटो हातात घेऊन बसेन . स्वामी विचारतील , " हा फोटो कशासाठी ?" आणि ते माझ्या शेजारी बसतील . इथे सांगता होईल . दोन महाशक्तींच्या संयोगाने वैश्विक स्फोट होईल . जगामध्ये प्रचंड उलथापालथ होईल . निर्मितीपूर्वी झालेल्या वैश्विक स्फोटासारखाच हा स्फोट असेल . स्तूप उघडून त्यातील अणु ' तारका स्पंदने ' होऊन संपूर्ण विश्व व्यापून टाकतील.  जगातील सर्वांच्या स्पर्श संवेदनांमध्ये परिवर्तन होईल. कलियुगाचे सत्य युग बनेल . कलियुगातील दुष्प्रवृतींचे परिवर्तन होऊन सद्गुणांचा प्रसार होईल. 
                   पाच पांढऱ्या लिलिची फुले ५ कोश, ५ प्राण, ५ कर्मेंद्रिये व ५ ज्ञानेंद्रिये यांच्या शुद्धीचे द्योतक आहेत. सर्वत्र सत्य, धर्म, शांती, प्रेम आणि अहिंसा ही पाच मूल्ये विद्यमान असतील . सद्गुणांचा उदभव होईल. मी स्वामींना ISI चा अर्थ विचारला. स्वामी म्हणाले, " मी ( I ) साई ( S ) नाही, तुझ्या भावविश्वाद्वारे मी ( I ) ' मी ' विना ' मी ' वसंता होऊन येत आहे ." मी साई विना वसंता होऊन येत आहे . माझ्या भावविश्वातून येणार असल्यामुळे ते असे सांगत आहेत . माझ्या भावविश्वाद्वारे स्वामी पुन्हा येतील.

जय साईराम 

व्ही. एस. 




    वसंतामृतमाला ४७ व्या पुष्पा बरोबर समाप्त होत आहे. यापुढील श्री वसंतसाईंचे  ' मी विना मी ' हे आत्मचरित्र क्रमशः प्रसिद्ध करणार आहोत.  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा