ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" व्यक्तिगत आवडनिवडीने अंतर्ज्ञानाला झाकोळले आहे. "
प्रस्तावना
माझ्या डाय-यांमध्ये फक्त माझी परमेश्वरप्राप्तीची उत्कट इच्छा व त्याविषयी माझ्या मनात उमलणारे भाव यांचाच उल्लेख आहे. रोजनिशीमध्ये काही खाजगी बाबी, कुटुंबातील काही गोपनीय वा इतर गोष्टी असू शकतात, त्यामुळे सहसा रोजनिशी दुसरे कोणी वाचत नाही. माझ्या रोजनिशा मात्र पुस्तकांच्या रूपाने प्रकाशित झाल्यात, कारण माझ्या रोजनिशा केवळ परमेश्वराप्रती असलेल्या माझ्या प्रेमभावनेच भरलेल्या आहेत. या प्रेमभावातूनच अनेक गीते, काव्ये आणि अनुभव यांचा उद् भव झाला आहे.
स्वामी म्हणतात,
" आपुल्या प्रेमाचा खजिना न बंदिस्त पेटीत दागिन्यांच्या
खुला ठेवला चौराह्यावर, पडण्या दृष्टीस सकलांच्या !
या ! या ! सकलजनांनो या !
पहा, पहा ! अन् जाणून घ्या !… करिसी तू पाचारण"
मला मी ( अहम्) नसल्यामुळे, गोष्टी लपवून ठेवणे मला माहितच नाही. भौतिक प्रेम लपवले जाऊ शकते. परमेश्वराप्रती असणारे प्रेम लपवून का ठेवायचे ? कामवासना लपवल्या पाहिजेत कारण त्या भौतिकतेशी निगडीत असतात. परमेश्वराप्रती असणाऱ्या प्रेमात सर्वांना सहभागी करून घ्यावे, हा ' मी विना मी ' चा स्थायीभाव आहे. प्रत्येक जीवाचा अंतर्यामी परमेश्वर आहे. तो सर्वसाक्षी आहे. छोट्याशा निळसर रंगाच्या ज्योतीस्वरुपात तो हृदयामध्ये वास करतो. जीवाच्या साधनेतील प्रगतीनुसार परमेश्वर स्वतःचे प्रकटीकरण करतो. इथूनच जीवाच्या प्रभुचरणी संपूर्ण शरणागतीच्या प्रवासास सुरुवात होते. आपला अहंकार मन, बुद्धी आणि इंद्रिये प्रभूचरणी अर्पण करून जीव रिक्त बनतो. अहंकार पूर्णपणे प्रभूचरणी अर्पण केल्यानंतर ' मी ' चे अस्तित्व नाहीसे होते. वैयक्तिक ओळख राहतच नाही. जीव पूर्णपणे रिक्त झाल्यानंतर त्याला ' मी विना मी ' ही अवस्था प्राप्त होते. यालाच आत्मसाक्षात्कार वा आत्मदर्शन म्हणतात.
प्रथमतः वसंता ' मी ', तिचा अंतर्यामी परमेश्वर सत्य साई यांच्यामध्ये एकरूप झाली. वसिष्ठ गुहेमध्ये तिचा स्वामींशी योग झाला. ही शुद्ध सत्व स्थिती आहे. तथापि देहाचे अस्तित्व राहिले. का ? देह निर्मल बनवून परमेश्वराला अर्पण करण्यासाठी देहाचे अस्तित्व राहिले. हा भौतिक देह केवळ याच कारणासाठी दिला जातो. ' मी विना मी ' ला नाम आणि रूप यांची गरज काय ? तर परमेश्वरामध्ये विलीन होण्यासाठी. त्यानंतर ' मी ' ची स्वतंत्र ओळख उरतच नाही आणि म्हणूनच ती अज्ञात जीवन जगत आहे.
मी ज्योतीपासून जन्मले आणि परत ज्योतिस्वरुप होईन. नामरुपविरहीत ' मी विना मी ' ला जर ओळखायचं झालंच तर नवनिर्मिती, नवयुग, सत्ययुग ह्याद्वारा ओळखता येईल.
वसंत साई
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा