ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" सर्वजण माझे कुटुंबिय आहेत. माझे शेजारी, मार्ग सर्वकाही माझेच आहेत असा आपण विचार केला पाहिजे सर्वांच्या हातात हात घालून वैश्विक प्रेमाची अनुभूती घेता येते. "
संपादकीय
' दिव्यत्व स्वतःच्याच मानवत्वाकडे कोणत्या दृष्टीने पाहते ' ह्यावर दृष्टीक्षेप टाकणारे हे एक आगळेवेगळे पुस्तक आहे. परमोच्च प्रेमाचा परमोच्च सत्याकडे होणारा प्रवास व संपूर्ण मानवजातीच्या उद्धारासाठी झालेली त्याची नाट्यमय फलश्रुती याची ही कथा आहे. शुद्ध सत्व अवस्था प्राप्त केलेला जीव, तसेच स्वतःचे ' मी विना मी ' असे वर्णन करणारा हा आत्मा स्वतःच्याच जीवनाचा अभ्यास कसा करतो ? दिव्यत्वाशी योग झालेल्या, जीवनातील क्षण न् क्षण ईशचिंतनात घालवणाऱ्या जीवाला ज्ञान व प्रेमाच्या विस्तारित होणाऱ्या नोंद तर राहूच देत, गतजीवनातील मैलाचे दगड तरी कसे काय आठवणार ? पर्वतांच्या उंच शिखरांवरून जाऊन सर्वांना ऐकू जाईल एवढ्या मोठ्या आवाजात त्या गुपित उघड करतात ' भगवान श्री सत्य साई बाबा या युगाचे अवतार आहेत . या लवकर या आणि त्यांच्या दिव्य सान्निध्याचा पुरेपूर लाभ घ्या. '
श्री वसंतसाई, एका छोट्याशा खेड्यातील बेताचे शिक्षण झालेली एक साधीसुधी स्त्री. पवित्र नाडीग्रंथामध्ये त्यांचा ' परमेश्वराची अर्धांगिनी ' असा वारंवार उल्लेख आला आहे. त्या आपल्या ज्ञानदृष्टीने गतआयुष्याकडे पाहतात, जे त्यांचे सत्यदर्शन करणारा मार्गच आहे. त्यांच्या ह्या आत्मचरित्रात, आतापर्यंत झालेले अवतार, कर्मकायदा, जीवात्माचा परमात्म्याकडे प्रवास आणि निर्मिती यासारख्या विषयांचे असामान्य अंतर्ज्ञान विशद केले आहे.
केवळ भगवंतासाठी व्यतीत केलेल्या ७१ वर्षांच्या जीवनयात्रेतील चढउतार, वसंतसाईंच्या म्हणजेच मी विना मी च्या दृष्टीकोनातून उलगडून दाखवले आहेत. ज्याप्रमाणे गंगामातेने आपल्या जलप्रवाहाने पृथ्वीला व्यापून टाकले, त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या प्रेमप्रवाहात अखिल जगताला चिंब भिजवून टाकले. त्या त्यांच्या प्रेमाने आणि तपोबलाने संपूर्ण जगामध्ये आणि सकलजनांमध्ये परिवर्तन घडवत आहेत. त्यांची परमेश्वरासाठी असणारी अतृप्त तृष्णा, त्यांच्या त्यागाची परिपूर्णता, ' भगवान श्री सत्य साई बाबा ' हे पृथ्वीवर अवतरलेला परमेश्वर अशी अढळ निष्ठा आणि समस्त मानवजातीला मुक्ती मिळवून देण्याचा निर्धार, या पुस्तकाच्या वाचकांना प्रेरणा देवो.
या आत्मचरित्राचे संकलन करताना श्री वसंतसाईंनी त्यांच्या कार्यकर्त्यांना प्रकाशित व अप्रकाशित पुस्तकातील महत्वाचे उतारे समाविष्ट करण्यास सांगितले; जे त्यांच्या जीवनाच्या विशिष्ट कालावधीतील त्यांच्या अवस्थेचे यथार्थ चित्रण उभे करतील. त्यांची पुस्तके म्हणजे त्यांचे जीवन, त्यांचे साध्य आणि त्यांची परमेश्वरासाठी असणारी अतृप्त तृष्णा हे प्रतिबिंबित करणाऱ्या दिव्य भावांचे वेलबुट्टीदार वस्त्र आहे. यातील काही गद्यरचना, पद्यरचना व गीते अम्मांनी स्वतः इंग्रजीमध्ये रचली आहेत.
साई राम
संपादक
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा