रविवार, २८ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " मन वेड्या माकडासारखे आहे ते सांगेल तसे वागू नका. बुद्धीचा वापर करून विवेकाने वागा."

प्रकरण चार

आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु

                   आज मी कृष्णाला लिहिलेल्या पत्रांच्या वहीतील एक पान सहज उघडले. ते २५ जून १९८४ ला लिहिलेले पत्र होते. मी अशी केवढी पत्रं लिहिली आहेत ? ती पोस्टात तरी टाकता येतील का ?
कान्हा, कान्हा. 
                   मी तुझ्यासाठी सारखी रडत असते. पण माझे रुदन तुझ्या कानावरच पडत नाही. तू असे म्हणतोस की जर एखाद्याने तुझ्याकडे अंतःकरणपूर्वक वर मागितला तर तू त्याची इच्छा पूर्ण करतोस. मी तर केवळ तुलाच मागगते आहे ! 
                   दुर्योधनाने पांडवांना जंगलात पाठवले. त्यांच्यासाठी तू महाभारताचे युद्ध रचलेस. अर्जुनाने तुझ्या विश्वरूप दर्शनाची इच्छा केली, तू त्याचा सारथी झालास. तुला शरण येणाऱ्या सर्वांचे तू रक्षण करशील असे तू वचन दिले आहेस. परंतु माझ्या बाबतीत तू तुझा शब्द पाळला नाहीस. असं असता तुझी शिकवण कोण बरं आचरणात आणेल ? मी माझ्या कवितेत लिहिले आहे ते सत्य आहे. तू तुझा शब्द मोडलास. हे तुझं नेहमीचंच आहे. 
                    युद्धसमयी तू हातामध्ये शस्त्र धारण करणार नाहीस असे प्रतिपादन केले असूनही, तू चक्र उचलून भीष्मांना मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यामागे धावलास. तू असे का केलेस ? तुझ्या अर्जुनावरील आत्यंतिक प्रेमामुळे तू हे केलेस. तुझे वेडे प्रेम दुथडी भरून वाहत असते. त्या तुझ्या प्रेमाचा तू माझ्यावर वर्षाव करणार नाहीस का ? 
                     माझी एक इच्छा आहे. मी जेवढी सारखी तुझ्या विचारात हरवलेली असते, माझे अंतःकरण जेवढे तुझ्यासाठी द्रवते तेवढेच प्रेम तूही मला दिले पाहिजेस. तू माझ्या प्रेमासाठी आर्जवे केली पाहिजेस आणि तुझे अंतःकरणही माझ्या प्रेमासाठी द्रवले पाहिजे. तुझ्यासाठी वणवण भटकणारी मी एक भिकारीण आहे. तुझ्यासाठी मी सर्वांचे पाय धरते. कांची कामकोटीचे संत स्वामी पारिजात कण्णन, स्वामी अन्वयानंद आणि इतर अनेक संतमहात्म्यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी किती तरी पत्रे लिहिली. मी रमण, राघवेंद्र, रामकृष्ण, विवेकानंद, शारदादेवी, सत्य साई यांचीही मनःपूर्वक प्रार्थना केली. या यादीला अंत नाही. कान्हा आता पुरे ! मी आता यापुढे नाही सांगू शकत. तुलाही माझ्यासाठी अशीच तळमळ लागली पाहिजे. तूही माझ्यासाठी असेच वेडेपिसे व्हायला हवेसे. तू आता माझ्या जीवाची तगमग पाहतो आहेस व आनंद घेतो आहेस. मी ही असेच करेन. 

तुझी बालिका वसंता 
 
उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साई राम

गुरुवार, २५ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " परमेश्वराच्या सान्निध्यात धन, नावलौकिक हे सर्व शून्यवत आहे. परमेश्वर हवा हीच एकमात्र इच्छा धरा."

प्रकरण चार

 आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु 

७ जून १९९० 
                  मी स्वामींवर १००० कविता लिहून पूर्ण करते. आम्ही त्या कवितांचे पुस्तक चेन्नईला सुंदरममध्ये घेऊन जातो. तेथील कार्यकर्ते माझे पुस्तक स्वामींच्या पादुका पीठावर आशीर्वादासाठी ठेवतात. पुस्तकावर फूल दृश्यमान होते. स्वामींनी माझ्या पुस्तकाचा स्वीकार केल्याचे निदर्शक म्हणून मी ते फूल जपून ठेवते. 
२७ जुलै १९९० 
                 माझी पुट्टपर्तीला तिसरी भेट. माझ्या जीवनातील अजून एक सुवर्णपर्व. 
१८ ऑगस्ट १९९१ 
                 ' ज्ञानभूमी ' नावाच्या एका आध्यात्मिक मासिकामध्ये मला श्री. चेट्टियारांचा पत्ता मिळाला. त्यांच्या घरी जाताना मी खूपच आनंदात होते. मला भेटलेले ते पहिले साईभक्त. त्यांच्याकडून आम्ही लिखित जपाच्या वह्या घेतल्या. 
२३ फेब्रुवारी १९९२ 
                  माझ्या जीवनातील अजून एक सोनेरी दिवस, स्वामींच्या पादुकांचे आमच्या घरी आगमन. आम्ही यज्ञ करून पादुकांची प्रतिष्ठपणा करतो. चेट्टियार कुटुंबासह इतर अनेक भक्तांची उपस्थिती. आमच्या पादुका १८ व्या आहेत. 
२३ मार्च १९९२ 
                 जमशेदपूरहून श्री मुत्तूकृष्णस्वामी प्रभू रामचंद्रांच्या पादुका आमच्या घरी घेऊन येतात. ते बरेच यज्ञ करतात. 
११ एप्रिल १९९२ 
                 आम्हाला कोडाई कॅनालमध्ये स्वामींचे दर्शन होते. स्वामी आमच्या समोर उभे राहून आम्हाला आशीर्वाद देतात. 
१४ एप्रिल १९९३ 
                 कोडाई कॅनाल येथे स्वामींचे दर्शन. 
५ ऑक्टोबर १९९३ 
                 पुट्टपर्ती येथे स्वामींचे दर्शन. 
७ ऑक्टोबर १९९३
                 पुट्टपर्तीत पहिले पादुका पूजन 
८ ऑक्टोबर१९९३
                 पहिला पादनमस्कार 

*** 

 उर्वरित प्रकरण पुढील भागात ...... 

जय साईराम

बुधवार, २४ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

गोकुळाष्टमी निमित्त 

                  माझे प्रेम आता सर्वत्र पसरत आहे ! हे काही फक्त या जन्मातील ६० वर्षांच्या उग्र तपस्येमुळे नव्हे, तर पाच हजार वर्षांचे राधेचे प्रेम संपूर्ण विश्वभरात व्यापत आहे. माझ्यामधून पुरासारखे भरभरून वाहणारे प्रेम ह्या अखंड अश्रूधारांमुळे व पुस्तकांद्वारे सर्वव्याप्त होत आहे. आता मी प्रार्थना करते की माझे प्रेम प्रत्येक व्यक्तीमध्ये अन् सर्वप्राणिमात्रांमध्ये प्रवाहित व्हावे. ह्या विचाराची कंपने बनत त्यांचा प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रवेश होतो. 
                  ध्यानामध्ये स्वामी म्हणाले, राधेचे कृष्णावरील प्रेम अनमोल आहे. पाच हजार वर्षे अबाधित राहून ते काळाच्या कसोटीस उतरले आहे. युग बदलले, जगातही अनेक बदल घडून आले, सध्या कली शिखरावर आहे, तथापि राधेचे प्रेम एखाद्या अभेद्य किल्याच्या भिंतीप्रमाणे वृंदावनचे संरक्षण करीत आहे. राधेच्या प्रेमात सर्वच चिंब भिजून गेले आहेत. प्रत्येक प्राणी, प्रत्येक झाड, गवताचे प्रत्येक पाते, मातीचा कणनकण- सर्वच राधामय. चैतन्याची ही अवस्था मला उपनिषदातील एका श्लोकाची आठवण करून देते - ' ईशावास्यम् इदम् सर्वम् ' सर्व परमेश्वर आहे. वृंदावनातील सर्वजण सर्वत्र राधेस पाहतात. ईशावास्य उपनिषदात विषद केलेले हे सत्य आहे. हे अद्वैत होय. द्वैत रहित अवस्था. 



जय साईराम
 

रविवार, २१ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

           " परमेश्वराचे नामरूप हृदयामध्ये स्थापित करा म्हणजे तुम्हाला त्याचाशी थेट संवाद साधता येईल."

प्रकरण चार

आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु

२३ जानेवारी १९८४ 
              मदुराई येथील गांधी म्युझियममध्ये स्वामींचे पहिले दर्शन झाले. 
२७ सप्टेंबर १९८४ 
              आज गुरुवार, आमच्या घरी पहिले साई भजन झाले.
२९ जून १९८५ 
              आज गुरुवार, माझ्या जीवनातील सुवर्णदिन. मला पुट्टपर्तीत स्वामींचे पहिले दर्शन झाले. 
८ जुलै १९८५ 
              ध्यानामध्ये कृष्णाने मला सांगितले, " मी आणि स्वामी एकच आहोत. मी त्याला तुझ्या डोळ्यांविषयी सांगेन." रोज मला स्वामी आणि कृष्णाचे दर्शन होते. त्यांच्या अखंड कृपाप्रसादाचे अनेक दाखले ते मला देतात. नंतर स्वामींनी त्यांचा डोळा मला दिल्याचे गुपीत उघड केले. ' उपनिषदांच्या पलीकडे ' या पुस्तकात मी याविषयी लिहिले आहे. 
१९ नोव्हेंबर १९८५ 
                  मला ओळीने आठवडाभर स्वामींच्या सातव्या जन्मदिन सोहळ्याचे स्वप्न पडत होते. या दृश्याचे काव्य रूपांतर करून मी सनातन सारथीकडे  पाठवले व त्यांनी ते प्रकाशित केले. 
२८ ऑगस्ट १९८७ 
                 माझी पुट्टपर्तीला दुसरी भेट. माझा धाकटा मुलगा मणीवन्नन याच्या लग्नानंतर आम्ही सर्वजण स्वामींच्या दर्शनासाठी पुट्टपर्तीला गेलो. 
१ सप्टेंबर १९८७ 
                 माझा नातू सत्यन याच्या हातून स्वामी पत्र घेतात व त्याचा हात थोपटतात. स्वामी एका स्त्रीभक्ताच्या हाती भजन हॉलच्या बाहेर आमच्यासाठी विभूती, कुंकू व फुले पाठवतात. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव केलात की तुमच्याकडे खऱ्या प्रेमाचा चेहरा असेल."

प्रकरण चार 

आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु 

५ मार्च १९७६ 
                 आज मी स्वामींना पहिले पत्र लिहिले. 
२५ फेब्रुवारी १९८२ 
                स्वामींनी विभूती पाठवली आणि त्यांचा आमच्या घरामध्ये वास आहे सांगितले. 
                माझा भरत नावाचा एक चुलत भाऊ मुंबई येथे पर्यटकांचा गाईड म्हणून काम करतो. एकदा त्याच्या ऑफिसमध्ये दोन विदेशी पर्यटक आले. त्यांना पुट्टपर्तीला जायचे होते. भरतला इंग्रजी, हिंदी, तमीळ आणि तेलगू या चारही भाषा अवगत असल्याने त्याला त्यांच्या बरोबर जाण्यास सांगितले गेले. पुट्टपर्तीत पोहोचल्यावर ह्या दोघांना स्वामींनी मुलाखतीसाठी बोलावले. " स्वामींनी मला का बोलावले नाही " असे म्हणून गणपतीसमोर बसून भरत रडू लागला. त्याचक्षणी एक स्वयंसेवक पुढे आला व त्याने विचारले, " भरत कोण आहे ? स्वामी त्याला बोलावत आहेत " तो आनंदाने आत गेला. स्वामी त्याला म्हणाले, " तू त्यांच्यासोबत टूरवर जाऊ नकोस, तुझा मुलगा आजारी आहे. तू घरी परत जा." स्वामी पुढे म्हणाले, " तू नेहमी मुंबईला जाण्यापूर्वी काकांच्या घरी जातोस. ते तुला खडीसाखर देऊन आशीर्वाद देतात. माझा त्या काकांच्या घरामध्ये वास आहे. मी तुझ्या गावाला येईन पण काही काळानंतर, इतक्यात नाही." स्वामींनी भरतला विभूतीच्या पुड्या दिल्या. मुलाखतीनंतर विदेशी पर्यटकांची रजा घेऊन भरत वडक्क्मपट्टीला परतला. तो आमच्या घरी आला. त्याने स्वामींचा प्रसाद दिला व सर्व हकिकत सांगितली. हर्षभरीत झाल्याने माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. घरातल्या सर्वांनाच खूप आनंद झाला.
                 गावातील सर्व तरुणांना माझे वडील अध्यात्माचे धडे देतात. नोकरी वा उच्चशिक्षणानिमित्त परदेशी जाताना सर्वजण माझ्या वडिलांकडे येऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. माझे वडील नेहमी त्यांना श्रीरंगमचा प्रसाद ( खडीसाखर ) देतात. हेच स्वामींनी भरतला मुलाखतीत सांगितले. 
                 १९८२ साली स्वामींनी माझ्या नातेवाईकाला मुलाखत देऊन त्यांचा आमच्या घरात वास आहे आणि ते आमच्या बरोबरच आहेत असे सांगून आमच्यासाठी विभूती पाठवली. या प्रसंगाची मी आनंदाने पुन्हा पुन्हा उजळणी करते.

उर्वरित प्रकरण पुढील भागात 

जय साई राम
          
 

रविवार, १४ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " जर तुमच्यामध्ये व्यक्तिगत आवडीनिवडी, इच्छा, अहंकार यांचा काकणभर अंश शिल्लक असेल तर सत्याचे पूर्णांशाने दर्शन होणार नाही. "

प्रकरण चार 

आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु 

३ जानेवारी १९७६
                   आज प्रथमच थिरपातुरच्या डॉ. मनोन्मनींकडून स्वामींचा प्रसाद मिळाला. स्वामींच्या भक्त डॉ. मनोन्मनी ह्या मदुराईमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. एक निष्णात डॉक्टर म्हणून त्या गावात प्रसिद्ध आहेत. माझा जन्मही त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये झाला. थिरपातुरमध्ये माझे काका काकू हॉटेल चालवतात. माझ्या काकू अत्यंत भाविक आहेत. डॉक्टरांचे कुटुंब साईभक्त असल्यामुळे त्यांच्या घरी साप्ताहिक भजन असते. दर महिन्याला जोलारपेटचे भजनी मंडळ तेथे येऊन भजन गातात. माझ्या काकाकाकूंकडून मला या सर्व गोष्टी माहीत होतात. जेव्हा जेव्हा ते वडक्क्मपट्टीला येतात तेव्हा ते डॉक्टरांच्या घरून विभूती घेऊन येतात. एकदा त्यांनी सनातन सारथीचा एक अंक आणला. त्यांनी माझा पत्ता व ५ रुपये वर्गणी घेऊन डॉक्टर मनोन्मनींकडे दिली. त्यांनी ती पुढे प्रशांती निलयम येथे पाठवली. त्यानंतर दर महिन्याला मला सनातन सारथीचा अंक मिळू लागला. 
                  सनातन सारथीच्या वाचनानंतर माझे वडील आणि आजी यांनी स्वामींचा साक्षात् नारायण म्हणून स्वीकार केला. स्वामी माझ्या आजीच्या स्वप्नात येऊन कौटुंबिक व आध्यात्मिक विषयांवर बोलत असत. 
                   माझा जन्म डॉ. मनोन्मनींच्या मदुराईमधील हॉस्पिटलमध्ये झाला. त्यांच्यामुळेच माझा पुनर्जन्म झाला. स्वामींविषयी माहिती मिळाल्यामुळेच हा पुनर्जन्म झाला. त्यांनी मला नवीन जन्म दिला. ज्यांनी मला या जगामध्ये आणले. त्याच आता मला या भौतिक जगाच्या बेड्यांतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवत आहेत. 

उर्वरित मजकूर पुढील भागात .....

जय साईराम

गुरुवार, ११ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" अखंड प्रामाणिक प्रयत्नांद्वारे परमेश्वरी कृपेचा लाभ होतो."


प्रकरण चार 
आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे
 
                 " मी माझ्या प्रेमभावाचा वर्षाव केला आणि तो साईकृपेच्या जलाने वृद्धिंगत झाला." 
पथावरील आध्यात्मिक टप्पे : १९७४ ते १९९३ 
३० मे १९७४
                माझ्या चुलत भावाने मला सत्य साई बाबांवर लिहिलेल्या एका पुस्तकाविषयी सांगितले मी श्री. कस्तुरींचे ' सत्यम शिवम सुंदरम ' वाचायला सुरुवात केली. मला पूजा करण्यासाठी स्वामींचा एक फोटो हवा होता. त्यासाठी मी अखंड प्रार्थना करत होते. 
६ नोव्हेंबर १९७५ 
               आज गुरुवार आहे, मी स्वामींचा छोटा फोटो देवघरात ठेवला. 
१९ नोव्हेंबर १९७५ 
               आज स्वामी प्रथमच माझ्या स्वप्नात आले. 
२८  नोव्हेंबर १९७५ 
              स्वामी माझ्या स्वप्नात आले. त्यांनी माझ्या कपाळाला विभूती लावली आणि ते म्हणाले, " मी तुला कधीही अंतर देणार नाही. शेवटपर्यंत मी तुझ्याबरोबर असेन."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साई राम 

 

रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वराला त्याच्या इच्छेनुसार तुमचे जीवन चालवू द्या."

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरु 

                   तुम्ही सहजगत्या याचे अनुसरण करू शकता. जे जे काही आपण पहातो किंवा करतो ते परमेश्वराशी जोडायचे. तोडणे आणि जोडणे याची काही उदाहरणे खाली देत आहे. 
Computer - Contemplatic on Her 
Gooseberry - Go inside ... Hurry 
Thursday - Everyday is thurst day for Swami 
Hospital - Heart Sai Petal 
Cotton - Caught on Sai love 
Bathroom - Bath through om 
                   २४ तास परमेश्वराच्या अनुसंधानात राहा. हेच तप आहे. त्यासाठी तुम्हाला वनात वा गुहेत जाण्याची आवश्यकता नाही. कठोर व्रतवैकल्ये, उपास तापास करण्याची गरज नाही. जे काही कराल ते कृपया परमेश्वराचे स्मरण करून करा. 
*  *  *
                  गेली ६० वर्षे मी गृहस्थाश्रमी संन्यासिनीचे जीवन जगत आहे. काही वर्षांपूर्वी वाचन केलेल्या नाडीग्रंथात याचा उल्लेख आढळला. ' त्या गृहस्थाश्रमी संन्यासी आहेत.' असे त्यामध्ये म्हटले आहे. त्यात पुढे असेही म्हटले आहे, की वयाच्या ६३ व्या वर्षी त्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून आश्रमात संन्यस्त जीवन जगतील. त्यांना ब्रम्हज्ञान प्राप्त होईल. त्या श्री सत्य साई बाबांची भक्ती करत असतील आणि सत्य साई बाबांशी संयुक्त असतील. त्या साई स्वरूपच आहेत. ही  सर्व भाकिते आज खरी ठरली आहेत. 
                   भगवान बाबांना तक्रारवजा सुरात मी अनेकदा म्हणत असे, की त्यांनी मला केवळ भगवद्प्रीत्यर्थ जीवन देण्याऐवजी कौटुंबिक जीवनात का गुंतवले ? त्यावर भगवान म्हणत, ' राधा विवाहितच होती.' आता मला त्याचे कारण समजले. आंडाळचे एक गीत असे आहे, " माझे जीवन परमेश्वरासाठी आहे, मानवासाठी नाही." मी जर आंडाळसारखी परमेश्वरासाठी जगले असते तर माझे जीवन आंडाळप्रमाणेच झाले असते. परंतु मी वेगळी आहे. मी जगाला दाखवून दिले, की संसारात राहूनही एखादी व्यक्ती अखंड परमेश्वराच्या अनुसंधानात राहू शकते. केवळ ह्यासाठी स्वामींनी मला कौटुंबिक जीवनात गुंतवले. गृहस्थाश्रमी व्यक्ती क्षण न् क्षण परमेश्वरासोबत कशी राहू शकते हे माझ्या जीवनातून दर्शविले जाते. 

जय साई राम

गुरुवार, ४ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " आत्म्याचा परमेश्वराशी पूर्णत्वाने योग झाल्यानंतर सत्याचे पूर्णांशाने प्रकटीकरण होते. " 

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरु 

                   परमेश्वर चरणी अर्पण केलेल्या फलाशाविरहित कर्मांमधून प्रचंड ऊर्जेची निर्मिती होते. कर्मांचा कर्मयोग होतो. कौटुंबिक जबाबदाऱ्या, भक्तांचे आदरातिथ्य, तपस्या करून मला कधीही थकल्यासारखे वाटत नसे. त्याचे हेच रहस्य आहे. कोणतेही कर्म करताना जर भगवन्नामातील जादुई शक्तीला आवाहन केले, तर अजिबात कंटाळा वा थकवा जाणवत नाही. 
                   ह्या तत्वावर आधारीत मुक्ती निलयममधील आश्रमवासी ' तोडजोड ' नावाचा एक खेळ खेळतात. त्याची थोडक्यात माहिती खाली देत आहे. 
                  कागदाच्या चिठ्ठ्यांवर काही शब्द लिहून एका बॉक्समध्ये चिठ्ठ्या ठेवल्या जातात. खेळ खेळणाऱ्याने त्यातील चिठ्ठ्या उचलायच्या आणि त्यामध्ये जे शब्द लिहिले असतील ते शब्द परमेश्वराशी जोडायचे. किंवा त्याच्या मूळ अर्थाच्या जोडीने आध्यात्मिक अर्थ लावायचा. आम्ही सर्वजण हा खेळ खेळतो आणि दिव्यानंदाची अनुभूती घेतो. उदा. मी एक चिठ्ठी उचलली त्यावर पॉरिज ( porridge ) हा शब्द लिहिला होता. त्यावर मी pour prema age after age ( युगानुयुगे प्रेमाचा वर्षाव करा ) हा आध्यात्मिक अर्थ सांगितला. हे ऐकताक्षणी सर्वांनी आनंद व्यक्त केला. जेव्हा तुम्ही प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडता तेव्हा हे असेच घडते. तुम्हाला दिव्यानंदाचा लाभ होतो. हा आनंद का बरं मिळतो ? कारण त्या वस्तूमध्ये असलेल्या परमेश्वराशी तुम्ही स्वतःला जोडता. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साई राम