ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
गोकुळाष्टमी निमित्त
ध्यानामध्ये स्वामी म्हणाले, राधेचे कृष्णावरील प्रेम अनमोल आहे. पाच हजार वर्षे अबाधित राहून ते काळाच्या कसोटीस उतरले आहे. युग बदलले, जगातही अनेक बदल घडून आले, सध्या कली शिखरावर आहे, तथापि राधेचे प्रेम एखाद्या अभेद्य किल्याच्या भिंतीप्रमाणे वृंदावनचे संरक्षण करीत आहे. राधेच्या प्रेमात सर्वच चिंब भिजून गेले आहेत. प्रत्येक प्राणी, प्रत्येक झाड, गवताचे प्रत्येक पाते, मातीचा कणनकण- सर्वच राधामय. चैतन्याची ही अवस्था मला उपनिषदातील एका श्लोकाची आठवण करून देते - ' ईशावास्यम् इदम् सर्वम् ' सर्व परमेश्वर आहे. वृंदावनातील सर्वजण सर्वत्र राधेस पाहतात. ईशावास्य उपनिषदात विषद केलेले हे सत्य आहे. हे अद्वैत होय. द्वैत रहित अवस्था.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा