ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरावर प्रेमाचा वर्षाव केलात की तुमच्याकडे खऱ्या प्रेमाचा चेहरा असेल."
प्रकरण चार
आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु
आज मी स्वामींना पहिले पत्र लिहिले.
२५ फेब्रुवारी १९८२
स्वामींनी विभूती पाठवली आणि त्यांचा आमच्या घरामध्ये वास आहे सांगितले.
माझा भरत नावाचा एक चुलत भाऊ मुंबई येथे पर्यटकांचा गाईड म्हणून काम करतो. एकदा त्याच्या ऑफिसमध्ये दोन विदेशी पर्यटक आले. त्यांना पुट्टपर्तीला जायचे होते. भरतला इंग्रजी, हिंदी, तमीळ आणि तेलगू या चारही भाषा अवगत असल्याने त्याला त्यांच्या बरोबर जाण्यास सांगितले गेले. पुट्टपर्तीत पोहोचल्यावर ह्या दोघांना स्वामींनी मुलाखतीसाठी बोलावले. " स्वामींनी मला का बोलावले नाही " असे म्हणून गणपतीसमोर बसून भरत रडू लागला. त्याचक्षणी एक स्वयंसेवक पुढे आला व त्याने विचारले, " भरत कोण आहे ? स्वामी त्याला बोलावत आहेत " तो आनंदाने आत गेला. स्वामी त्याला म्हणाले, " तू त्यांच्यासोबत टूरवर जाऊ नकोस, तुझा मुलगा आजारी आहे. तू घरी परत जा." स्वामी पुढे म्हणाले, " तू नेहमी मुंबईला जाण्यापूर्वी काकांच्या घरी जातोस. ते तुला खडीसाखर देऊन आशीर्वाद देतात. माझा त्या काकांच्या घरामध्ये वास आहे. मी तुझ्या गावाला येईन पण काही काळानंतर, इतक्यात नाही." स्वामींनी भरतला विभूतीच्या पुड्या दिल्या. मुलाखतीनंतर विदेशी पर्यटकांची रजा घेऊन भरत वडक्क्मपट्टीला परतला. तो आमच्या घरी आला. त्याने स्वामींचा प्रसाद दिला व सर्व हकिकत सांगितली. हर्षभरीत झाल्याने माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. घरातल्या सर्वांनाच खूप आनंद झाला.
गावातील सर्व तरुणांना माझे वडील अध्यात्माचे धडे देतात. नोकरी वा उच्चशिक्षणानिमित्त परदेशी जाताना सर्वजण माझ्या वडिलांकडे येऊन त्यांचे आशीर्वाद घेतात. माझे वडील नेहमी त्यांना श्रीरंगमचा प्रसाद ( खडीसाखर ) देतात. हेच स्वामींनी भरतला मुलाखतीत सांगितले.
१९८२ साली स्वामींनी माझ्या नातेवाईकाला मुलाखत देऊन त्यांचा आमच्या घरात वास आहे आणि ते आमच्या बरोबरच आहेत असे सांगून आमच्यासाठी विभूती पाठवली. या प्रसंगाची मी आनंदाने पुन्हा पुन्हा उजळणी करते.
उर्वरित प्रकरण पुढील भागात
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा