ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" मन वेड्या माकडासारखे आहे ते सांगेल तसे वागू नका. बुद्धीचा वापर करून विवेकाने वागा."
प्रकरण चार
आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु
कान्हा, कान्हा.
मी तुझ्यासाठी सारखी रडत असते. पण माझे रुदन तुझ्या कानावरच पडत नाही. तू असे म्हणतोस की जर एखाद्याने तुझ्याकडे अंतःकरणपूर्वक वर मागितला तर तू त्याची इच्छा पूर्ण करतोस. मी तर केवळ तुलाच मागगते आहे !
दुर्योधनाने पांडवांना जंगलात पाठवले. त्यांच्यासाठी तू महाभारताचे युद्ध रचलेस. अर्जुनाने तुझ्या विश्वरूप दर्शनाची इच्छा केली, तू त्याचा सारथी झालास. तुला शरण येणाऱ्या सर्वांचे तू रक्षण करशील असे तू वचन दिले आहेस. परंतु माझ्या बाबतीत तू तुझा शब्द पाळला नाहीस. असं असता तुझी शिकवण कोण बरं आचरणात आणेल ? मी माझ्या कवितेत लिहिले आहे ते सत्य आहे. तू तुझा शब्द मोडलास. हे तुझं नेहमीचंच आहे.
युद्धसमयी तू हातामध्ये शस्त्र धारण करणार नाहीस असे प्रतिपादन केले असूनही, तू चक्र उचलून भीष्मांना मारण्याच्या उद्देशाने त्यांच्यामागे धावलास. तू असे का केलेस ? तुझ्या अर्जुनावरील आत्यंतिक प्रेमामुळे तू हे केलेस. तुझे वेडे प्रेम दुथडी भरून वाहत असते. त्या तुझ्या प्रेमाचा तू माझ्यावर वर्षाव करणार नाहीस का ?
माझी एक इच्छा आहे. मी जेवढी सारखी तुझ्या विचारात हरवलेली असते, माझे अंतःकरण जेवढे तुझ्यासाठी द्रवते तेवढेच प्रेम तूही मला दिले पाहिजेस. तू माझ्या प्रेमासाठी आर्जवे केली पाहिजेस आणि तुझे अंतःकरणही माझ्या प्रेमासाठी द्रवले पाहिजे. तुझ्यासाठी वणवण भटकणारी मी एक भिकारीण आहे. तुझ्यासाठी मी सर्वांचे पाय धरते. कांची कामकोटीचे संत स्वामी पारिजात कण्णन, स्वामी अन्वयानंद आणि इतर अनेक संतमहात्म्यांना मी मार्गदर्शन करण्यासाठी किती तरी पत्रे लिहिली. मी रमण, राघवेंद्र, रामकृष्ण, विवेकानंद, शारदादेवी, सत्य साई यांचीही मनःपूर्वक प्रार्थना केली. या यादीला अंत नाही. कान्हा आता पुरे ! मी आता यापुढे नाही सांगू शकत. तुलाही माझ्यासाठी अशीच तळमळ लागली पाहिजे. तूही माझ्यासाठी असेच वेडेपिसे व्हायला हवेसे. तू आता माझ्या जीवाची तगमग पाहतो आहेस व आनंद घेतो आहेस. मी ही असेच करेन.
तुझी बालिका वसंता
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साई राम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा