ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जर तुमच्यामध्ये व्यक्तिगत आवडीनिवडी, इच्छा, अहंकार यांचा काकणभर अंश शिल्लक असेल तर सत्याचे पूर्णांशाने दर्शन होणार नाही. "
प्रकरण चार
आध्यात्मिक प्रगतीचे टप्पे पुढे सुरु
आज प्रथमच थिरपातुरच्या डॉ. मनोन्मनींकडून स्वामींचा प्रसाद मिळाला. स्वामींच्या भक्त डॉ. मनोन्मनी ह्या मदुराईमध्ये वैद्यकीय व्यवसाय करतात. एक निष्णात डॉक्टर म्हणून त्या गावात प्रसिद्ध आहेत. माझा जन्मही त्यांच्याच हॉस्पिटलमध्ये झाला. थिरपातुरमध्ये माझे काका काकू हॉटेल चालवतात. माझ्या काकू अत्यंत भाविक आहेत. डॉक्टरांचे कुटुंब साईभक्त असल्यामुळे त्यांच्या घरी साप्ताहिक भजन असते. दर महिन्याला जोलारपेटचे भजनी मंडळ तेथे येऊन भजन गातात. माझ्या काकाकाकूंकडून मला या सर्व गोष्टी माहीत होतात. जेव्हा जेव्हा ते वडक्क्मपट्टीला येतात तेव्हा ते डॉक्टरांच्या घरून विभूती घेऊन येतात. एकदा त्यांनी सनातन सारथीचा एक अंक आणला. त्यांनी माझा पत्ता व ५ रुपये वर्गणी घेऊन डॉक्टर मनोन्मनींकडे दिली. त्यांनी ती पुढे प्रशांती निलयम येथे पाठवली. त्यानंतर दर महिन्याला मला सनातन सारथीचा अंक मिळू लागला.
सनातन सारथीच्या वाचनानंतर माझे वडील आणि आजी यांनी स्वामींचा साक्षात् नारायण म्हणून स्वीकार केला. स्वामी माझ्या आजीच्या स्वप्नात येऊन कौटुंबिक व आध्यात्मिक विषयांवर बोलत असत.
माझा जन्म डॉ. मनोन्मनींच्या मदुराईमधील हॉस्पिटलमध्ये झाला. त्यांच्यामुळेच माझा पुनर्जन्म झाला. स्वामींविषयी माहिती मिळाल्यामुळेच हा पुनर्जन्म झाला. त्यांनी मला नवीन जन्म दिला. ज्यांनी मला या जगामध्ये आणले. त्याच आता मला या भौतिक जगाच्या बेड्यांतून मुक्त होण्याचा मार्ग दाखवत आहेत.
उर्वरित मजकूर पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा