रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वराला त्याच्या इच्छेनुसार तुमचे जीवन चालवू द्या."

प्रकरण तिसरे 

मूळ पुढे सुरु 

                   तुम्ही सहजगत्या याचे अनुसरण करू शकता. जे जे काही आपण पहातो किंवा करतो ते परमेश्वराशी जोडायचे. तोडणे आणि जोडणे याची काही उदाहरणे खाली देत आहे. 
Computer - Contemplatic on Her 
Gooseberry - Go inside ... Hurry 
Thursday - Everyday is thurst day for Swami 
Hospital - Heart Sai Petal 
Cotton - Caught on Sai love 
Bathroom - Bath through om 
                   २४ तास परमेश्वराच्या अनुसंधानात राहा. हेच तप आहे. त्यासाठी तुम्हाला वनात वा गुहेत जाण्याची आवश्यकता नाही. कठोर व्रतवैकल्ये, उपास तापास करण्याची गरज नाही. जे काही कराल ते कृपया परमेश्वराचे स्मरण करून करा. 
*  *  *
                  गेली ६० वर्षे मी गृहस्थाश्रमी संन्यासिनीचे जीवन जगत आहे. काही वर्षांपूर्वी वाचन केलेल्या नाडीग्रंथात याचा उल्लेख आढळला. ' त्या गृहस्थाश्रमी संन्यासी आहेत.' असे त्यामध्ये म्हटले आहे. त्यात पुढे असेही म्हटले आहे, की वयाच्या ६३ व्या वर्षी त्या गृहस्थाश्रमाचा त्याग करून आश्रमात संन्यस्त जीवन जगतील. त्यांना ब्रम्हज्ञान प्राप्त होईल. त्या श्री सत्य साई बाबांची भक्ती करत असतील आणि सत्य साई बाबांशी संयुक्त असतील. त्या साई स्वरूपच आहेत. ही  सर्व भाकिते आज खरी ठरली आहेत. 
                   भगवान बाबांना तक्रारवजा सुरात मी अनेकदा म्हणत असे, की त्यांनी मला केवळ भगवद्प्रीत्यर्थ जीवन देण्याऐवजी कौटुंबिक जीवनात का गुंतवले ? त्यावर भगवान म्हणत, ' राधा विवाहितच होती.' आता मला त्याचे कारण समजले. आंडाळचे एक गीत असे आहे, " माझे जीवन परमेश्वरासाठी आहे, मानवासाठी नाही." मी जर आंडाळसारखी परमेश्वरासाठी जगले असते तर माझे जीवन आंडाळप्रमाणेच झाले असते. परंतु मी वेगळी आहे. मी जगाला दाखवून दिले, की संसारात राहूनही एखादी व्यक्ती अखंड परमेश्वराच्या अनुसंधानात राहू शकते. केवळ ह्यासाठी स्वामींनी मला कौटुंबिक जीवनात गुंतवले. गृहस्थाश्रमी व्यक्ती क्षण न् क्षण परमेश्वरासोबत कशी राहू शकते हे माझ्या जीवनातून दर्शविले जाते. 

जय साई राम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा