रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

ॐ  श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           "शुद्ध सत्वाचे तेज प्रकट झाल्यानंतर देह दिव्य तेजाने झळकतो ."

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन

                 मी म्हटल्याप्रमाणे  माझी सर्व पुस्तके ही माझ्या पहिल्या पुस्तकाचे विस्तृतीकरण आहे .  पहिल्या पुस्तकात स्वामी म्हणतात , "तुझ्या प्रेमाचे ऋण फेडण्यासाठी मी दुसरा अवतार घेईन ." त्यावेळी मी त्यावर विशेष विचार केला नाही . त्यामुळे त्यावेळी मला स्वामींच्या शब्दातील  गर्भितार्थ समजला नव्हता . आता मला समजले की  स्वामींचे ते वाक्य प्रेमसाई अवताराशी निगडित होते . 'प्रेमसाई अवतार ' संबंधित पुस्तके म्हणजे स्वामींच्या या एका वाक्याचे विस्तृत रूप आहे . समर शॉवर्सच्या २३९ च्या पानावर स्वामी म्हणतात,

उर्वरित प्रकरण पुढील भागात

जय साईराम       

गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " साधनेद्वारे सर्वजण परमेश्वराला जाणू शकतात व परमेश्वर होऊ शकतात. " 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन

                स्वामींनी स्वतः माझ्या पहिल्या पुस्तकावर स्वाक्षरी केली. या पुस्तकात स्वामी म्हणतात की मी राधा आहे, प्रकृती आहे, त्यांची शक्ती आहे. माझी सर्व पुस्तके म्हणजे दुसरे काही  नसून याच तीन अवस्थांचे विस्तृतीकरण आहे. स्वामींनी माझ्या पहिल्या पुस्तकावर स्वाक्षरी करून हेच सूचित केले की माझ्या सर्व लिखाणास त्यांची मान्यता आहे. 
               रुपेरी बेट ह्या विस्तृतीकरणाचे उदाहरण आहे. स्वामींनी मला प्रथम सांगितले की त्यांनी ध्यानात दाखवलेले रुपेरी बेट म्हणजे वैकुंठ होय. ह्यानेच पुढे मुक्ती निलयम हे रूप घेतले, नंतर तेही बदलले. स्वामींनी सांगितले की मुक्ती निलयम म्हणजे भूलोक वैकुंठ आहे. 
रुपेरी बेट - वैकुंठ 
वैकुंठ - मुक्ती निलयम 
मुक्ती निलयम - भूलोक वैकुंठ 
                 काकभुशंडी ऋषींच्या नाडीत म्हटले आहे की मुक्ती स्तूप हे भूलोक वैकुंठ आणि स्वर्गीय वैकुंठ या दोहोंमधील पूल आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " केवळ शुद्ध निर्विचारी मनोवस्थेमध्ये परमेश्वराचा खरा आवाज ऐकू येतो. " 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                 त्यानंतर दररोज स्वामी माझ्याशी ध्यानामध्ये बोलू लागले. केवळ ध्यानातच नव्हे, तर कोणत्याही वेळी स्वामी माझ्याशी बोलतात. ह्या संभाषणाची मी माझ्या डायरीमध्ये नोंद करते आणि नंतर ते पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केले जाते. आतापर्यंत माझी ३१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २० हुन अधिक पुस्तके लिहून पूर्ण झाली असून प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. 
               माझ्या पहिल्या पुस्तकात स्वामी म्हणाले, " तू राधा आहेस. तू माझी शक्ती आहेस. या अगोदर मी स्वामींना ' अम्मा ' म्हणत असे. मग स्वामींनीच मला सांगितले, " तू राधा आहेस. तुझ्या स्वभावाला मधुरभाव भक्ती शोभते. तू ह्या मार्गाचे अनुसरण कर. "
               नंतर ते म्हणाले, " राधेच्या गहिऱ्या प्रेमामुळेच मी तुझ्यावर कृपावर्षाव करत आहे. आता तर तू माझ्यावर त्याहूनही अधिक प्रेमवर्षाव करत आहेस. तुझे हे ऋण फेडण्यासाठीच मी दुसरा अवतार घेईन. " 
               हे सर्व मी पहिल्या पुस्तकात लिहिले. स्वामींनी माझ्या पहिल्या पुस्तकावर स्वाक्षरी केली आहे. माझे पहिले पुस्तक हे इतर सर्व पुस्तकांचे बीज आहे. आता मी जे लिहिते, ते त्या पुस्तकातील मजकुराचे विस्तृतीकरण आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

परमपूज्य श्री वसंतसाई अम्मा यांच्या ७८ व्या जन्मदिनानिमित्त 

' भगवत् प्राप्तीचा मार्ग प्रेम आहे. '


                    प्रेम हा भगवत् प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे ; दुसरे कोणतेही मार्ग नाहीत. स्वामींनी हेच, " ईश्वर प्रेम आहे, प्रेमांत जगा." असे सांगितले . भगवान मूर्तिमंत प्रेम आहे. आपण सर्व त्याच्यापासून आलो आहोत, म्हणून आपण स्वतः प्रेम बनले पाहिजे. प्रेम नसेल तर जात, धर्म, देश, मी व सर्व माझे असे अनेक भेदभाव निर्माण होतात. माणूस विचार करतो; हे माझे आहे, ते त्याचे आहे. या संकुचित विचारांनी माणूस भिंती उभ्या करतो. अवघे विश्व, परमेश्वराचा महाल आहे. असे असूनही माणूस भिंती उभारतो, नावे देतो व म्हणतो हा माझा देश, तो तुझा वगैरे. एका घरात पुष्कळ खोल्या असतात; स्वयंपाक खोली, हॉल, झोपण्याची खोली, पाहुण्यांची खोली, आंघोळीची खोली वगैरे. माणूस स्वतःचे घर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये विभागतो. अगदी तसेच तो परमेश्वराचा विश्व हा महाल सुद्धा विविध खोल्यांमध्ये विभागतो. हे विश्व भगवंताचा महाल आहे. प्रत्येक देश व प्रत्येक धर्म त्याच्या खोल्या आहेत. तथापि अशा भेदांमुळे प्रश्न उद्भवतात व त्यांची परिणती युद्धांमध्ये होऊ शकते. या लढायांमध्ये कित्येक जण धारातिर्थी पडतात. प्राण्यांमध्ये शत्रुत्वाची भावना असते; मानवात प्राण्यांचे गुण असतात. म्हणून प्रत्येकाने प्रेम व्हावे. जन्ममृत्यूच्या व्याधीला प्रेम हे एकमेव औषध आहे. लोक हो ! मायेतून जागे व्हा व सर्वांभूती प्रेम करा. तुमचे प्रेम तुमच्या मी व माझे या संकुचित भावविश्वात बंदिस्त करू नका. तुमच्या ' मी व माझे ' या भावामुळे तुम्ही ईश्वराच्या सुंदर महालाची तोडफोड करता. कोणी तुमच्या घराची जर नासधूस केली तर तुम्ही ताबडतोब पोलिसांना बोलावता. तुम्ही ईश्वराच्या महालाची नासधूस केलीत तर तुम्ही स्वतःलाच जीवनमृत्यूच्या चक्राच्या तुरुंगात टाकता. 
                श्रेष्ठ अवतार येथे आला, त्याने प्रेमाची शिकवण दिली. त्याने जागतिक कर्मे व पापकर्मे स्वतःच्या शरीरावर घेतली. या पृथ्वीवर कोणीही तुमच्या पापांचे भागीदार होणार नाहीत. रत्नाकराच्या जीवनावरून हे सिद्ध होते. प्रेम नसेल तर सर्व दुष्प्रवृत्ती आपल्याकडे येतात. या प्रवृत्तींमुळे निर्माण होणाऱ्या पापामध्ये तुमच्या कुटुंबातील कोणीही वाटेकरी होऊ शकत नाही. असे असूनही तो श्रेष्ठ अवतार अवतरला; त्याने तुमचे पाप व कर्म स्वीकारले. तुम्ही त्याचे उतराई कसे होणार ? या कर्माचे ऋण चुकविण्याचा एकच एक मार्ग आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाबाहेरील चार व्यक्तींवर अकृत्रिम प्रेम करायला सुरुवात करा. उद्या आठ जण. अशा तऱ्हेने तुमच्या प्रेमाचे वर्तुळ मोठे करत जा. तुमच्या कर्मांचा हिशेब चुकविण्यासाठी हा एकच एक उपाय आहे. 

जय साईराम !!  


      वरील documtantary बघण्याकरिता कृपया 'Mukthi Stupi ' यावर क्लिक करावे. 

गुरुवार, २० ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " जोपर्यंत मनामधून पूर्णतः द्वैतभावाचे उच्चाटन होत नाही तोपर्यंत सत्याची पूर्णांशाने प्राप्ती होत नाही. "
  
प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

आशीर्वादात्मक ग्वाही .... 
                 १४ एप्रिल १९९६ रोजी स्वामी माझ्या ध्यानात आले आणि म्हणाले, " जरी प्रलय होऊन संपूर्ण विश्व लयास गेले अथवा सूर्य जरी पश्चिमेला उगवला, तरी मी तुला कधीही माझे विस्मरण होऊ देणार नाही आणि कोणत्याही कारणास्तव मी तुला कधीही अंतर देणार नाही. रडू नकोस. हे माझं सत्यवचन आहे." 
               असे म्हणत स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला. 
               हे वचन स्वामींकडून मला १२ वर्षांपूर्वीच मिळाले. आता परत मी तेच मागत आहे. ह्या १२ वर्षांत अनेक घटना घडल्या. मी बरीच पुस्तके लिहिली मी ' प्रेम साई अवतार ' आणि ' भगवंताचे अखेरचे दिवस ' ही पुस्तके लिहिली. या पुस्तकांमध्ये मी माझ्या आणि स्वामींच्या मध्ये असणाऱ्या शाश्वत बंधाविषयी लिहिले आहे. तथापि आजही माझे मन भयग्रस्त आहे. ही भीती माझी पाठ कधी सोडणार ? 
               मला इथे एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. मी बराच काळ स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी प्रार्थना करत होते. स्वामी मला सारखे विचारात, की  मी भौतिक देह आणि सूक्ष्म देह वेगळे का मानते ? त्यानंतर दि. ७ नोव्हेंबर १९९६ रोजी एका सोनियाच्या क्षणाने माझे जीवन उजळून टाकले. रात्री खूप वेळ मला झोप लागली नाही. शेवटी २ नंतर कधीतरी माझा डोळा लागला. मी गाढ झोपेत होते. अचानक माझ्या खांद्याला हाताचा स्पर्श जाणवला. मी तात्काळ डोळे उघडले, तो हात धरला आणि म्हणाले, " स्वामी ! स्वामी ! " मी पाहते तो काय स्वामी माझ्या बाजूला उभे ! मी हातात धरलेला तो दिव्य हस्त ! मी त्याचे हलकेसे चुंबन घेतले. स्वामींना माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला, माझे सांत्वन केले आणि एकाएकी अदृश्य झाले. काही क्षणांकरता का होईना, मला त्यांचे दिव्य दर्शन झाले. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची माझी मनोकामना त्यांनी पूर केली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  


रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

  " त्यागामध्ये सत्याचे प्रकटीकरण करण्याचे सामर्थ्य असते. "

प्रकरण पाच

चंद्र आणि मन 

                  अहं चे वक्र विचार मनात शिल्लक असताना जर एखाद्याने आश्रम सुरु केला तर तो आश्रम शुचितेच्या तत्वावर आधारित नसेल. स्वतःला रिक्त न करता जर एखाद्याने अनुयायी गोळा करून आश्रम सुरु केला तर ती आध्यात्मिकतेचि विटंबनाच होईल. 
                केवळ अहंकाररहित मनावरच परमेश्वराची मालकी असते. भगवद्गीतेत अर्जुन श्रीकृष्णाला म्हणत, की एकवेळ वाऱ्यालाही नियंत्रण करता येईल पण मनाला नाही. 
                मन हे माकडासारखे असते. जर आपण मनावर पूर्ण नियंत्रण ठेवून ते परमेश्वराला अर्पण केले तरच अहंकाराचे अस्तित्व राहणार नाही. 
               माझ्या घरात अनेक चमत्कार घडले. लक्षार्चन करताना अनेक वनौषधी साक्षात झाल्या. त्यावेळी मदुराई आणि विरूधुनगर समित्यांचे अनेक भक्तगण उपस्थित होते. मी भयभीत झाले आणि स्वामींची प्रार्थना केली, " स्वामी, मला हे चमत्कार, ही गर्दी काहीही नको. स्वामी, मला तुमचे कधीही विस्मरण न्  होवो. जर मला तुमचे विस्मरण झाले तर तत्काळ मी देहत्याग करेन." 
                अशातऱ्हेने मी साश्रू नयनांनी सतत स्वामींची प्रार्थना केली. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

" आपले अनुभव हे आपल्या भावविश्वाचे  प्रतिबिंब होय. "

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                  आता हे वाचल्यानंतर माझ्या मनात एक विचार आला. चंद्राची नेहमी मनाशी तुलना केली जाते. मन हेच बंध किंवा मुक्तीचे कारण आहे. जन्ममृत्यूचे  कारणही मनच आहे. मनात उमटणारे विचार आपल्या पुढील जन्मास कारणीभूत असतात. स्वामींनी मला चंद्र देणं आणि मी तो त्यांना परत करणं याचा गर्भितार्थ काय ? 
                 स्वामींनी मला दिलेले मन मी त्यांना परत केले. 
                 दि. १७ एप्रिल २००२ रोजी वसिष्ठ गुहेमध्ये स्वामी मला म्हणाले, " तू शुद्ध सत्वामध्ये माझ्याशी संयुक्त झालीस. तू आता एक आश्रम सुरु कर. " 
                 मी माझी इंद्रिये, बुद्धी, मन, अहंकार सर्व स्वामींना अर्पण केले आणि स्वतःला रिक्त केले. मी सर्वकाही शुद्ध करून त्यांना अर्पण केले. चंद्राच्या दृश्यातून हे निर्दशनास येते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

            " परमेश्वराच्या भावामध्ये तादात्म्य पावलेल्या जीवाची एक छोटीशी इच्छा वैश्विकरूप धारण करते व त्यामुळे समस्त सृष्टी लाभान्वित होते. "

प्रकरण पाच

चंद्र आणि मन

                  दि. ७-५-९७ रोजी मदुराईच्या सुब्रमण्यम चेट्टियार यांच्या घरी स्वामींनी पुस्तकावर स्वाक्षरी केली. चेट्टियारांनी पुस्तकाची प्रस्तावना लिहिली . याच पुस्तकामध्ये मला ३० मार्च १९९६ रोजी दिसलेल्या दृश्याविषयी मी लिहिले आहे.
                 त्यावेळेस स्वामींनी मला विचारले...
                " मी तुला चंद्र आणून देऊ का ?  अचानक मंद प्रकाशित शीतल चंद्रमा त्यांच्या हातात आला. स्वामींनी तो माझ्या हातात दिला. तो एवढा मोठा होता की माझ्या दोन्ही हातात मावत नव्हता. त्यावर खाचखळगे होते. मी आकाशात दृष्टिक्षेप टाकला तर तिथे चंद्र नव्हता. अहाहा !  किती आनंददायी ! स्वामींनी माझ्या हातातून तो तेजस्वी चंद्रमा घेऊन परत आकाशात पाठवला. 

 उर्वरित  प्रकरण पुढील भागात  .....

जय साईराम

गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः   

 सुविचार 

             " तुमच्या स्वभावातून तुमच्यामध्ये असणारा परमेश्वर प्रतिबिंबित होतो. " 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

               ज्यांनी अशा प्रेमाची अनुभूती घेतली असेल त्यांनाच माझ्या विरहाग्निचा ताप समजू शकेल. माझी आई लहानपणीच निवर्तल्यामुळे मी स्वामींना 'अम्मा ' म्हणून संबोधत असे. मी त्यांना मातृरूपात पाहून शेकडो पत्रे लिहिली आहेत . भावनावेग अनावर होऊन, मी हजारो काव्ये आणि गीतांच्या रूपात माझे भाव वर्णिले आहेत. मी नेहमी अश्रू ढाळत असे. काही काळानंतर स्वामी माझ्याशी ध्यानात बोलू लागले. ती संभाषणे म्हणजेच माझे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होय. 
७ मे १९९७ 
                   ' इथेच, याक्षणी, मुक्ती - भाग १ ' या पुस्तकाचे हस्तलिखित स्वामींच्या आशीर्वादासाठी मी मदुराईच्या श्री. सुब्रमण्यम चेट्टीयार यांच्या घरी ठेवले. स्वामी त्यांच्या घरी आले असताना त्यांचा मुलगा श्रीनिवास चेट्टीयार स्वामींना म्हणाले, " स्वामी तुमची सौ. वसंताबरोबरची संभाषणे पुस्तकरूपात लिहिली आहेत."
                  स्वामींनी ते हस्तलिखित चाळले व म्हणाले " ते तमिळमध्ये लिहिले आहे ." 
                 श्रीनिवास म्हणाले," हो स्वामी, तुम्ही त्यांच्याशी तमिळमध्ये संवाद केल्याने ते तमिळमध्ये लिहिले आहे."
                त्यावर स्वामी म्हणाले," खरंच, मी तिच्याशी तमिळमध्ये बोललो. ठीक आहे. मग मी आता काय करावे ?"
              " स्वामी, त्यांना तुमची स्वाक्षरी हवी आहे."
              स्वामींनी हस्तलिखित घेऊन त्यावर ' with love Baba ' अशी स्वाक्षरी केली आणि म्हणाले," बघा, मी हे अगदी मोठ्या अक्षरात लिहिले आहे." ह्या घटनेचा एक फोटो काढण्यात आला. तो त्या पुस्तकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध केला आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 
       " प्रत्येक जीवाच्या भावविश्वाद्वारे परमेश्वराचे स्वरूप निर्माण होते. "

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                क्षणोक्षणी स्वामींचा विचार करकरून मी किती सहन केलं, अगदी क्षणभरसुद्धा मी स्वामींना विसरले नाही .. दिवसाचे २४ तास माझं मन त्यांच्यावर केंद्रित होतं. 
               माझ्या अवस्थेचे वर्णन करण्यासाठी एखादं उदाहरण तरी कसं देऊ ? उदाहरण नाहीच आहे मुळी ! माझ्या अवस्थेच वर्णन प्रत्यक्ष परमेश्वरही करू शकणार नाही. खुद्द स्वामींनासुद्धा वर्णन करता येणार नाही !


उर्वरित प्रकरण पुढील भागात .... 

जय साईराम