रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

परमपूज्य श्री वसंतसाई अम्मा यांच्या ७८ व्या जन्मदिनानिमित्त 

' भगवत् प्राप्तीचा मार्ग प्रेम आहे. '


                    प्रेम हा भगवत् प्राप्तीचा एकमेव मार्ग आहे ; दुसरे कोणतेही मार्ग नाहीत. स्वामींनी हेच, " ईश्वर प्रेम आहे, प्रेमांत जगा." असे सांगितले . भगवान मूर्तिमंत प्रेम आहे. आपण सर्व त्याच्यापासून आलो आहोत, म्हणून आपण स्वतः प्रेम बनले पाहिजे. प्रेम नसेल तर जात, धर्म, देश, मी व सर्व माझे असे अनेक भेदभाव निर्माण होतात. माणूस विचार करतो; हे माझे आहे, ते त्याचे आहे. या संकुचित विचारांनी माणूस भिंती उभ्या करतो. अवघे विश्व, परमेश्वराचा महाल आहे. असे असूनही माणूस भिंती उभारतो, नावे देतो व म्हणतो हा माझा देश, तो तुझा वगैरे. एका घरात पुष्कळ खोल्या असतात; स्वयंपाक खोली, हॉल, झोपण्याची खोली, पाहुण्यांची खोली, आंघोळीची खोली वगैरे. माणूस स्वतःचे घर वेगवेगळ्या खोल्यांमध्ये विभागतो. अगदी तसेच तो परमेश्वराचा विश्व हा महाल सुद्धा विविध खोल्यांमध्ये विभागतो. हे विश्व भगवंताचा महाल आहे. प्रत्येक देश व प्रत्येक धर्म त्याच्या खोल्या आहेत. तथापि अशा भेदांमुळे प्रश्न उद्भवतात व त्यांची परिणती युद्धांमध्ये होऊ शकते. या लढायांमध्ये कित्येक जण धारातिर्थी पडतात. प्राण्यांमध्ये शत्रुत्वाची भावना असते; मानवात प्राण्यांचे गुण असतात. म्हणून प्रत्येकाने प्रेम व्हावे. जन्ममृत्यूच्या व्याधीला प्रेम हे एकमेव औषध आहे. लोक हो ! मायेतून जागे व्हा व सर्वांभूती प्रेम करा. तुमचे प्रेम तुमच्या मी व माझे या संकुचित भावविश्वात बंदिस्त करू नका. तुमच्या ' मी व माझे ' या भावामुळे तुम्ही ईश्वराच्या सुंदर महालाची तोडफोड करता. कोणी तुमच्या घराची जर नासधूस केली तर तुम्ही ताबडतोब पोलिसांना बोलावता. तुम्ही ईश्वराच्या महालाची नासधूस केलीत तर तुम्ही स्वतःलाच जीवनमृत्यूच्या चक्राच्या तुरुंगात टाकता. 
                श्रेष्ठ अवतार येथे आला, त्याने प्रेमाची शिकवण दिली. त्याने जागतिक कर्मे व पापकर्मे स्वतःच्या शरीरावर घेतली. या पृथ्वीवर कोणीही तुमच्या पापांचे भागीदार होणार नाहीत. रत्नाकराच्या जीवनावरून हे सिद्ध होते. प्रेम नसेल तर सर्व दुष्प्रवृत्ती आपल्याकडे येतात. या प्रवृत्तींमुळे निर्माण होणाऱ्या पापामध्ये तुमच्या कुटुंबातील कोणीही वाटेकरी होऊ शकत नाही. असे असूनही तो श्रेष्ठ अवतार अवतरला; त्याने तुमचे पाप व कर्म स्वीकारले. तुम्ही त्याचे उतराई कसे होणार ? या कर्माचे ऋण चुकविण्याचा एकच एक मार्ग आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबाबाहेरील चार व्यक्तींवर अकृत्रिम प्रेम करायला सुरुवात करा. उद्या आठ जण. अशा तऱ्हेने तुमच्या प्रेमाचे वर्तुळ मोठे करत जा. तुमच्या कर्मांचा हिशेब चुकविण्यासाठी हा एकच एक उपाय आहे. 

जय साईराम !!  


      वरील documtantary बघण्याकरिता कृपया 'Mukthi Stupi ' यावर क्लिक करावे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा