रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

       " केवळ शुद्ध निर्विचारी मनोवस्थेमध्ये परमेश्वराचा खरा आवाज ऐकू येतो. " 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

                 त्यानंतर दररोज स्वामी माझ्याशी ध्यानामध्ये बोलू लागले. केवळ ध्यानातच नव्हे, तर कोणत्याही वेळी स्वामी माझ्याशी बोलतात. ह्या संभाषणाची मी माझ्या डायरीमध्ये नोंद करते आणि नंतर ते पुस्तकाच्या स्वरूपात प्रकाशित केले जाते. आतापर्यंत माझी ३१ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. २० हुन अधिक पुस्तके लिहून पूर्ण झाली असून प्रकाशनाच्या वाटेवर आहेत. 
               माझ्या पहिल्या पुस्तकात स्वामी म्हणाले, " तू राधा आहेस. तू माझी शक्ती आहेस. या अगोदर मी स्वामींना ' अम्मा ' म्हणत असे. मग स्वामींनीच मला सांगितले, " तू राधा आहेस. तुझ्या स्वभावाला मधुरभाव भक्ती शोभते. तू ह्या मार्गाचे अनुसरण कर. "
               नंतर ते म्हणाले, " राधेच्या गहिऱ्या प्रेमामुळेच मी तुझ्यावर कृपावर्षाव करत आहे. आता तर तू माझ्यावर त्याहूनही अधिक प्रेमवर्षाव करत आहेस. तुझे हे ऋण फेडण्यासाठीच मी दुसरा अवतार घेईन. " 
               हे सर्व मी पहिल्या पुस्तकात लिहिले. स्वामींनी माझ्या पहिल्या पुस्तकावर स्वाक्षरी केली आहे. माझे पहिले पुस्तक हे इतर सर्व पुस्तकांचे बीज आहे. आता मी जे लिहिते, ते त्या पुस्तकातील मजकुराचे विस्तृतीकरण आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा