ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" जोपर्यंत मनामधून पूर्णतः द्वैतभावाचे उच्चाटन होत नाही तोपर्यंत सत्याची पूर्णांशाने प्राप्ती होत नाही. "
प्रकरण पाच
चंद्र आणि मन
१४ एप्रिल १९९६ रोजी स्वामी माझ्या ध्यानात आले आणि म्हणाले, " जरी प्रलय होऊन संपूर्ण विश्व लयास गेले अथवा सूर्य जरी पश्चिमेला उगवला, तरी मी तुला कधीही माझे विस्मरण होऊ देणार नाही आणि कोणत्याही कारणास्तव मी तुला कधीही अंतर देणार नाही. रडू नकोस. हे माझं सत्यवचन आहे."
असे म्हणत स्वामींनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.
हे वचन स्वामींकडून मला १२ वर्षांपूर्वीच मिळाले. आता परत मी तेच मागत आहे. ह्या १२ वर्षांत अनेक घटना घडल्या. मी बरीच पुस्तके लिहिली मी ' प्रेम साई अवतार ' आणि ' भगवंताचे अखेरचे दिवस ' ही पुस्तके लिहिली. या पुस्तकांमध्ये मी माझ्या आणि स्वामींच्या मध्ये असणाऱ्या शाश्वत बंधाविषयी लिहिले आहे. तथापि आजही माझे मन भयग्रस्त आहे. ही भीती माझी पाठ कधी सोडणार ?
मला इथे एका गोष्टीचा उल्लेख करायचा आहे. मी बराच काळ स्वामींच्या प्रत्यक्ष दर्शनासाठी प्रार्थना करत होते. स्वामी मला सारखे विचारात, की मी भौतिक देह आणि सूक्ष्म देह वेगळे का मानते ? त्यानंतर दि. ७ नोव्हेंबर १९९६ रोजी एका सोनियाच्या क्षणाने माझे जीवन उजळून टाकले. रात्री खूप वेळ मला झोप लागली नाही. शेवटी २ नंतर कधीतरी माझा डोळा लागला. मी गाढ झोपेत होते. अचानक माझ्या खांद्याला हाताचा स्पर्श जाणवला. मी तात्काळ डोळे उघडले, तो हात धरला आणि म्हणाले, " स्वामी ! स्वामी ! " मी पाहते तो काय स्वामी माझ्या बाजूला उभे ! मी हातात धरलेला तो दिव्य हस्त ! मी त्याचे हलकेसे चुंबन घेतले. स्वामींना माझ्या चेहऱ्यावरून हात फिरवला, माझे सांत्वन केले आणि एकाएकी अदृश्य झाले. काही क्षणांकरता का होईना, मला त्यांचे दिव्य दर्शन झाले. त्यांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची माझी मनोकामना त्यांनी पूर केली.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा