गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः   

 सुविचार 

             " तुमच्या स्वभावातून तुमच्यामध्ये असणारा परमेश्वर प्रतिबिंबित होतो. " 

प्रकरण पाच 

चंद्र आणि मन 

               ज्यांनी अशा प्रेमाची अनुभूती घेतली असेल त्यांनाच माझ्या विरहाग्निचा ताप समजू शकेल. माझी आई लहानपणीच निवर्तल्यामुळे मी स्वामींना 'अम्मा ' म्हणून संबोधत असे. मी त्यांना मातृरूपात पाहून शेकडो पत्रे लिहिली आहेत . भावनावेग अनावर होऊन, मी हजारो काव्ये आणि गीतांच्या रूपात माझे भाव वर्णिले आहेत. मी नेहमी अश्रू ढाळत असे. काही काळानंतर स्वामी माझ्याशी ध्यानात बोलू लागले. ती संभाषणे म्हणजेच माझे प्रकाशित झालेले पहिले पुस्तक होय. 
७ मे १९९७ 
                   ' इथेच, याक्षणी, मुक्ती - भाग १ ' या पुस्तकाचे हस्तलिखित स्वामींच्या आशीर्वादासाठी मी मदुराईच्या श्री. सुब्रमण्यम चेट्टीयार यांच्या घरी ठेवले. स्वामी त्यांच्या घरी आले असताना त्यांचा मुलगा श्रीनिवास चेट्टीयार स्वामींना म्हणाले, " स्वामी तुमची सौ. वसंताबरोबरची संभाषणे पुस्तकरूपात लिहिली आहेत."
                  स्वामींनी ते हस्तलिखित चाळले व म्हणाले " ते तमिळमध्ये लिहिले आहे ." 
                 श्रीनिवास म्हणाले," हो स्वामी, तुम्ही त्यांच्याशी तमिळमध्ये संवाद केल्याने ते तमिळमध्ये लिहिले आहे."
                त्यावर स्वामी म्हणाले," खरंच, मी तिच्याशी तमिळमध्ये बोललो. ठीक आहे. मग मी आता काय करावे ?"
              " स्वामी, त्यांना तुमची स्वाक्षरी हवी आहे."
              स्वामींनी हस्तलिखित घेऊन त्यावर ' with love Baba ' अशी स्वाक्षरी केली आणि म्हणाले," बघा, मी हे अगदी मोठ्या अक्षरात लिहिले आहे." ह्या घटनेचा एक फोटो काढण्यात आला. तो त्या पुस्तकाच्या सुरुवातीला प्रसिद्ध केला आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा