गुरुवार, ३० मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " परमेश्वराशिवाय कोणतीही गोष्ट अपरिवर्तनीय नाही हे नेहमी लक्षात ठेवा."

प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव 

                 २७ मे २००१ रोजी हा विवाह संपन्न झाला. माझ्या जीवनात दोन महत्वाच्या घटना घडल्याचे माझ्या लक्षात आले. एक मंगळसूत्र काढण्याची घटना आणि दुसरी स्वामींनी मंगळसूत्र बनवायला सांगितले व ते त्यांनी आशीर्वदित करून मला गळ्यात घालायला सांगितले. मी या जगाची नाही, हेच या दोन्ही घटना दर्शवितात. जन्मापासूनच माझ्या जीवनातील क्षण न्  क्षण हेच दर्शवितो की मी परमेश्वराची आहे. सामान्य कौटुंबिक जीवन जगण्यासाठी मी या जगात जन्म घेतलेला नाही. प्रत्येकाचे दुःख पाहून माझ्या मनात एकच विचार येई, की संपूर्ण जगाची यातून मी कशी मुक्तता करू ? प्रत्येक कुटुंबात पती पत्नी, मुले आणि पालक यांच्यामध्ये विसंवाद आणि विभक्तता  दिसून येते. जगात कोठेही शांती नाही. सत्य नाही. लोक सत्य का बोलत नाहीत ? ते सत्याचा विपर्यास करतात. कुठे आहे सत्य ? कुठे आहे धर्म ? लोक असे का वागतात ? मला हे कळतच नाही. 
                  आणि म्हणूनच मी स्वामींकडे, रडून रडून त्या सर्वांच्या मुक्तीसाठी दररोज प्रार्थना करते. मी स्वामींनी सांगते, " हे प्रभू , सर्वांना मुक्ती द्या. कृपा करून त्यांना त्यांच्या कर्मबंधनातून सोडवा. स्वामी, फक्त परमेश्वरावर प्रेम करण्यासाठीच तुम्ही मला या जगात आणले आहे. यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी या सर्व घटना माझ्या जीवनात घडतील. आता मला समजले की माझे जीवन सर्वसामान्यांसारखे नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

रविवार, २६ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" भयभीत व्यक्ती मुक्त होऊ शकत नाही."
प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव 

                स्वामींच्या दर्शनासाठी वेळेवर पोहोचता यावे म्हणून मला लवकर निघायचे होते. लगेचच स्नान करून व्हाईटफिल्डला निघालो. 
                वृंदावनला पोहोचल्यावर आम्ही दर्शनाची तयारी केली. आम्ही एका तबकात नवीन साडी, मंगळसूत्र (पदक ) आणि नवीन धागा, अक्षता आणि खडीसाखर ठेवली. एस. व्ही. नी ते तबक घेतले आणि आम्ही सर्व दर्शनासाठी निघालो. 
                साई रमेश हॉल गच्च भरला होता. माझ्या मनात विचार आला, " एवढ्या गर्दीत, स्वामी मंगळसूत्र कसे काय अनुग्रहित करणार ? सेवादल एस. व्ही. ना बसायला विशेष जागा देईल का ?" या विचारांनी मला सारखं रडायला येत होतं. 
               ' मी अगदी लहान असल्यापासूनच मला कृष्णाशी विवाह करायचा होता. आता माझे स्वप्न सत्यात उतरत होते. स्वामी, तुम्ही तुमच्या राधेचा संपूर्ण जगासमोर स्वीकार करा." 
                दर्शन संपले. आम्ही उत्कंठेने सर्वत्र पहात होतो. परंतु एस. व्ही.कुठे दिसत नव्हते ! सरतेशेवटी मी त्यांना माझ्याकडे धावत येताना पाहिले. त्यांच्या चेहऱ्यावर आनंद मावत नव्हता. ते म्हणाले," स्वामींनी आशीर्वाद दिला." ते मधुर शब्द मला अमृतासमान भासले. माझ्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. मी परमानंदांच्या लाटांवर स्वार झाले. स्वामींनी त्याला स्पर्श करून आशीर्वाद दिले. आम्ही हॉलमध्येच बसलो आणि मी मंगळसूत्र धारण केले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २३ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

              " जेव्हा सत्य आणि प्रेम यांचा संयोग होतो तेव्हा प्रेम, ज्ञान आणि सत्य यावर अधिष्ठित नव्या विश्वाची निर्मिती होते."

पुष्प सात 

मंगळसूत्राची देवघेव

                 गीताला हे सर्व सांगताना मला अश्रू आवरत नव्हते. मी एस. व्ही. ना मंगळसूत्र बनवून, २६ ता. ला कोईमतूर येथे घेऊन येण्यास सांगितले. मी तिथे एका विवाहसमारंभासाठी जाणार होते. त्यानंतर मी केरळच्या भक्तांबरोबर नव्हतेच. मी जणू आकाशात विहार करत होते. माझ्या मनात एकच विचार फेर धरून नाचत होता," मी स्वामींचे मंगळसूत्र घालणार, मी स्वामींचे मंगळसूत्र घालणार." 
                 एस. व्ही. त्यांची नवीन गाडी घेऊन कोईमतूरला आले. तेथून आम्ही वृंदावनकडे प्रयाण केले. आमच्याबरोबर यामिनी, होसूरच्या मोहना आणि केरळचे काही भक्तही होते. प्रवासात आम्ही गायत्री मंत्र, पुरुषसूक्त, नारायणसूक्त यांचे पठण केले व भजनेही गायली. दुपारी ३ वाजता आम्ही कोईमतूरला निघालो व पहाटे २ वाजता होसूरला मोहनांच्या घरी पोहोचलो.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   
 


रविवार, १९ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " परमेश्वराला आपण काय समर्पित करतो हे महत्वाचे नसून कसे समर्पित करतो हे महत्वाचे आहे ."

प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव 

१९ मे २००१ 
                   १५ दिवस मी अजिबात घर सोडले नाही . त्यांनतर मी गीताबरोबर नागरकोविलला गेले व तेथून पुढे केरळला गेले .केरळचे भक्त येऊन आम्हाला घेऊन गेले. केरळच्या राजूंच्या घरी आम्ही मुक्काम केला . सकाळच्या ध्यानात स्वामी म्हणाले , 
                  " एस. व्ही. ना लाल रंगाचा खडा जडवलेले पोट्टू मंगळसूत्र बनवायला सांग आणि नंतर तू आणि एस. व्ही.वृंदावनला या . एस. व्ही. ना ते दर्शनात घेऊन येण्यास सांग . मी ते आशीर्वादित करेन आणि मग तू ते गळ्यात घाल ."

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १६ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

             परमेश्वर केवळ एकच आहे, आपण सर्वजण त्याची लेकरे आहोत. हे सत्य आहे."

प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव 

आपूर्यमाणमचलप्रतिष्ठं 
समुद्रमापः प्रविशन्ति यव्दत 
तव्दन्कामा यं प्रविशन्ति सर्वे 
स शान्तिमाप्नोती न भगवद् गीता कामकामी 
अर्थ (गोरखपूर प्रेस गीतेनुसार )
                  ज्याप्रमाणे निरनिराळ्या नद्यांचे पाणी , सर्व बाजूंनी भरलेल्या व स्थिर असलेल्या समुद्रात त्याला विचलित न करताही सामावून जाते ; त्याचप्रमाणे सर्व भोग ज्या स्थितप्रज्ञ पुरुषामध्ये कोणत्याही प्रकारचा विकार उत्पन्न न करताच सामावून जातात , तोच पुरुष परमशांतीला प्राप्त होतो . भोगांची इच्छा करणारा नव्हे . 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, १२ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " तोंडातून येणार प्रत्येक शब्द, आपण आपले जीवन कसे जगू हे निर्धारित करतो." 

प्रकरण सात 

  मंगळसूत्राची देवघेव 

               उद्घाटन समारंभानंतर श्री. मनोहरन यांची तब्येत बरी नव्हती, तरीही ते आमच्याबरोबर (मी आणि एस. व्ही.) बिहारला येण्यास तयार झाले. आम्ही मार्चच्या १३ ता. ला निघालो. आमचा महिनाभराचा  दौरा होता. त्यानंतर दोन दिवसांनी त्यांची तब्येत अधिकच बिघडली. २१ मार्चला त्यांना झटका आला. आम्ही तातडीने पाटण्याला जाऊन त्यांना हॉस्पिटलमध्ये भर्ती केले. त्यानंतर पाचच मिनिटात त्यांची प्राणज्योत मालवली. मी मंगळसूत्र काढल्यानंतर दोनच महिन्यांनी मनोहरनना देवाज्ञा झाली. 
                 एस. व्ही. नी मनोहरनना विचारले," आपण कोणालाही उघड न करता फक्त  कुटुंबियांच्या समोर मंगळसूत्र काढू या का ? ते म्हणाले," आपण ते सर्वांसमक्ष काढू या." कोणता पती असे म्हणेल ? आमच्या जीवनात गोपनीय असे काहीच नव्हते. जे गुपीत कुटुंबापुरतेच मर्यादित ठेवता आले असते, ते त्यांनी सर्व जगाला ज्ञात करून दिले. ही सर्व स्वामींची बृहद्  योजना ( Master Plan ) होती. 
                 श्री मनोहरन यांचे अंत्यविधी गंगेच्या काठावर करण्यात आले.  त्यानंतर आम्ही मदुराईला परतलो. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....  

जय साईराम
 

गुरुवार, ९ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

            " जर एखाद्यास तुम्ही तुमचा शत्रू मानलेत तर तो विचार त्याच्या मनात प्रतिबिंबित होईल आणि तो ही तुम्हाला त्याचा शत्रू मानेल ." 
 
प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव 

               श्रीकृष्णाने भगवद्गीतेत सांगितल्यानुसार मी परमेश्वरासाठी स्त्री धर्माचा त्याग केला. जगातील कोणती स्त्री असे करू शकेल ? मी विश्वासाठी वैश्विक मुक्तीसाठी आणि भगवंतासाठी सर्वसंगपरित्याग केला माझी कथा वाचणाऱ्यांना कदाचित असे वाटेल," यांचे जीवन किती आगळेवेगळे आहे !" सामान्य मनुष्याच्या जीवनात अशा घटना घडतात का ? हे केवळ अवतारकार्यासाठी घडले आहे. 
                 मी मंगळसूत्र काढून ठेवल्यानंतर चार दिवसांनी स्वामी म्हणाले," त्यांच्या (मनोहरन ) मृत्यूनंतरही हा पवित्र धागा काढू नकोस. फक्त पिवळ्या रंगाच्या साड्या नेसत जा. तू आता जशी आहेस तशीच नेहमी राहा. आता त्यांच्यात आणि तुझ्यात कोणतेही बंध नाहीत. " मी हे सर्व एस. व्ही. ना सांगितले. मी नेहमी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसू लागले. स्वामी म्हणाले, " तू नित्यकल्याणी आहेस, अखंड सौभाग्यवती आहेस, हेच यातून सूचित होते." 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम

रविवार, ५ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " कोणत्याही एकाग्रतेने व मनःपूर्वक केलेल्या  कृतीमधून प्रेम प्रकट होते."

प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव

               भारतीय संस्कृतीमध्ये पती हयात असेपर्यंत स्त्री मंगळसूत्र काढत नाही. इथे श्री. मनोहरन यांनी स्वतः ते मंगळसूत्र दुर्गेच्या चरणी अर्पण केले. असे कोठेही घडलेले नाही. केवळ भगवंतच त्याच्या लीला जाणतो. अगदी लहान वयापासूनच माझ्या मनात श्रीकृष्णाशी विवाह करण्याची इच्छा होती. आज माझ्या वयाच्या ६३ व्या वर्षी माझ्या मुलांनी आणि पतींनी मला साईकृष्णाला अर्पण केले आहे. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. हे एक महद्आश्चर्य आहे. केवळ स्वामीच माझे सर्वकाही आहेत, सर्व बंधनातून मुक्त करून त्यांनी मला हे दाखवून दिले. 
               मी माझे मंगळसूत्र काढून स्वामींनी दिलेले पदक नवीन धाग्यात घालून गळ्यात घातले. मी पूर्वापार चालत आलेली आणि आचरली जाणारी धार्मिक व सामाजिक बंधने झुगारून दिली. परमेश्वरासाठी मी स्त्रीधर्माचा त्याग केला आणि माझ्या प्रभूने रचलेल्या अग्निदिव्यातून यशस्वीरित्या पार पडले. ही घटना खालील श्लोकाचा दाखला देते. 
सर्वधर्मान्परित्यज मामेकं शरणं व्रज 
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः 
सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. 
मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. चिंता करू नकोस. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, २ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" परमेश्वराला अनुभूती घेण्यासाठी भूतलावर अवतरावे  लागते ."
प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव 

                 आम्ही साई गीतलयम मध्ये मिरवणुकीने प्रवेश केला . उद्घाटन  समारंभासाठी अनेक भक्त जमले होते . परंतु काय घडणार आहे हे कोणालाच माहित नव्हते . त्यानंतर आम्ही संन्यास होम केला . पूर्णाहुती देण्यापूर्वी मी माझे मंगळसूत्र काढले आणि श्री मनोहरन यांच्या हातात दिले . त्यांनी ते दुर्गेच्या मूर्तीच्या चरणी अर्पण केले . पूर्णाहुती देताना मी प्रार्थना केली . " मी आमचे जीवन पूर्णाहुती म्हणून अर्पण करते ." दुर्गेच्या चरणी मंगळसूत्र अर्पण करतेवेळी सर्व उपस्थितांना गहिवरून आले . सर्वांचे डोळे पाणावले . सर्वांची हृदये हेलावून टाकणाऱ्या या प्रसंगाने माझ्या जीवनाचे नवीन पान उलटले .

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम