ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वराला अनुभूती घेण्यासाठी भूतलावर अवतरावे लागते ."
प्रकरण सात
मंगळसूत्राची देवघेव
आम्ही साई गीतलयम मध्ये मिरवणुकीने प्रवेश केला . उद्घाटन समारंभासाठी अनेक भक्त जमले होते . परंतु काय घडणार आहे हे कोणालाच माहित नव्हते . त्यानंतर आम्ही संन्यास होम केला . पूर्णाहुती देण्यापूर्वी मी माझे मंगळसूत्र काढले आणि श्री मनोहरन यांच्या हातात दिले . त्यांनी ते दुर्गेच्या मूर्तीच्या चरणी अर्पण केले . पूर्णाहुती देताना मी प्रार्थना केली . " मी आमचे जीवन पूर्णाहुती म्हणून अर्पण करते ." दुर्गेच्या चरणी मंगळसूत्र अर्पण करतेवेळी सर्व उपस्थितांना गहिवरून आले . सर्वांचे डोळे पाणावले . सर्वांची हृदये हेलावून टाकणाऱ्या या प्रसंगाने माझ्या जीवनाचे नवीन पान उलटले .
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा