रविवार, ५ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " कोणत्याही एकाग्रतेने व मनःपूर्वक केलेल्या  कृतीमधून प्रेम प्रकट होते."

प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव

               भारतीय संस्कृतीमध्ये पती हयात असेपर्यंत स्त्री मंगळसूत्र काढत नाही. इथे श्री. मनोहरन यांनी स्वतः ते मंगळसूत्र दुर्गेच्या चरणी अर्पण केले. असे कोठेही घडलेले नाही. केवळ भगवंतच त्याच्या लीला जाणतो. अगदी लहान वयापासूनच माझ्या मनात श्रीकृष्णाशी विवाह करण्याची इच्छा होती. आज माझ्या वयाच्या ६३ व्या वर्षी माझ्या मुलांनी आणि पतींनी मला साईकृष्णाला अर्पण केले आहे. हा माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय प्रसंग आहे. हे एक महद्आश्चर्य आहे. केवळ स्वामीच माझे सर्वकाही आहेत, सर्व बंधनातून मुक्त करून त्यांनी मला हे दाखवून दिले. 
               मी माझे मंगळसूत्र काढून स्वामींनी दिलेले पदक नवीन धाग्यात घालून गळ्यात घातले. मी पूर्वापार चालत आलेली आणि आचरली जाणारी धार्मिक व सामाजिक बंधने झुगारून दिली. परमेश्वरासाठी मी स्त्रीधर्माचा त्याग केला आणि माझ्या प्रभूने रचलेल्या अग्निदिव्यातून यशस्वीरित्या पार पडले. ही घटना खालील श्लोकाचा दाखला देते. 
सर्वधर्मान्परित्यज मामेकं शरणं व्रज 
अहं त्वां सर्वपापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुचः 
सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मलाच शरण ये. 
मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन. चिंता करू नकोस. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा