गुरुवार, २३ मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

              " जेव्हा सत्य आणि प्रेम यांचा संयोग होतो तेव्हा प्रेम, ज्ञान आणि सत्य यावर अधिष्ठित नव्या विश्वाची निर्मिती होते."

पुष्प सात 

मंगळसूत्राची देवघेव

                 गीताला हे सर्व सांगताना मला अश्रू आवरत नव्हते. मी एस. व्ही. ना मंगळसूत्र बनवून, २६ ता. ला कोईमतूर येथे घेऊन येण्यास सांगितले. मी तिथे एका विवाहसमारंभासाठी जाणार होते. त्यानंतर मी केरळच्या भक्तांबरोबर नव्हतेच. मी जणू आकाशात विहार करत होते. माझ्या मनात एकच विचार फेर धरून नाचत होता," मी स्वामींचे मंगळसूत्र घालणार, मी स्वामींचे मंगळसूत्र घालणार." 
                 एस. व्ही. त्यांची नवीन गाडी घेऊन कोईमतूरला आले. तेथून आम्ही वृंदावनकडे प्रयाण केले. आमच्याबरोबर यामिनी, होसूरच्या मोहना आणि केरळचे काही भक्तही होते. प्रवासात आम्ही गायत्री मंत्र, पुरुषसूक्त, नारायणसूक्त यांचे पठण केले व भजनेही गायली. दुपारी ३ वाजता आम्ही कोईमतूरला निघालो व पहाटे २ वाजता होसूरला मोहनांच्या घरी पोहोचलो.

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   
 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा