गुरुवार, ३० मार्च, २०१७

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " परमेश्वराशिवाय कोणतीही गोष्ट अपरिवर्तनीय नाही हे नेहमी लक्षात ठेवा."

प्रकरण सात 

मंगळसूत्राची देवघेव 

                 २७ मे २००१ रोजी हा विवाह संपन्न झाला. माझ्या जीवनात दोन महत्वाच्या घटना घडल्याचे माझ्या लक्षात आले. एक मंगळसूत्र काढण्याची घटना आणि दुसरी स्वामींनी मंगळसूत्र बनवायला सांगितले व ते त्यांनी आशीर्वदित करून मला गळ्यात घालायला सांगितले. मी या जगाची नाही, हेच या दोन्ही घटना दर्शवितात. जन्मापासूनच माझ्या जीवनातील क्षण न्  क्षण हेच दर्शवितो की मी परमेश्वराची आहे. सामान्य कौटुंबिक जीवन जगण्यासाठी मी या जगात जन्म घेतलेला नाही. प्रत्येकाचे दुःख पाहून माझ्या मनात एकच विचार येई, की संपूर्ण जगाची यातून मी कशी मुक्तता करू ? प्रत्येक कुटुंबात पती पत्नी, मुले आणि पालक यांच्यामध्ये विसंवाद आणि विभक्तता  दिसून येते. जगात कोठेही शांती नाही. सत्य नाही. लोक सत्य का बोलत नाहीत ? ते सत्याचा विपर्यास करतात. कुठे आहे सत्य ? कुठे आहे धर्म ? लोक असे का वागतात ? मला हे कळतच नाही. 
                  आणि म्हणूनच मी स्वामींकडे, रडून रडून त्या सर्वांच्या मुक्तीसाठी दररोज प्रार्थना करते. मी स्वामींनी सांगते, " हे प्रभू , सर्वांना मुक्ती द्या. कृपा करून त्यांना त्यांच्या कर्मबंधनातून सोडवा. स्वामी, फक्त परमेश्वरावर प्रेम करण्यासाठीच तुम्ही मला या जगात आणले आहे. यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी या सर्व घटना माझ्या जीवनात घडतील. आता मला समजले की माझे जीवन सर्वसामान्यांसारखे नाही. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा