रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही."

प्रकरण चौदा 

वसंतमयम् 

               स्वामी हे सांगताक्षणीच माझ्या मनात अनेक भावविचारांनी गर्दी केली ..... 
               " माझ्या प्रेमाने सर्व जीवांमध्ये प्रवेश केला पाहिजे. माझे प्रेम सर्वत्र ओसंडून वाहत आहे, विस्तारत आहे, सर्व विश्व व्यापून टाकत आहे. मी माझ्या प्रेमाने संपूर्ण विश्वामध्ये प्रेम घडवून आणेन. माझे प्रेम सर्वांमध्ये प्रवेश करून त्यांच्याद्वारे कार्य करेल."
              असा विचार करता करता, माझ्या बाजूला बसलेल्या स्वामींचाही मला विसर पडला ! असे हे विचार बाह्य जगतात पाठवण्याच्या नादात मी गढून गेले. हे विचार बाह्य जगतात पाठवण्याखेरीज मी दुसरे काहीही करण्याची गरज नाही, एवढेच पुरेसे आहे असे मला वाटत होते. लिहिणे वैगैरे कशाचीही गरज नाही. 
               स्वामींनी मला १९९७ मध्येच सांगितले, की मी जीवनमुक्त अवस्थेमध्ये आहे आणि त्यांनी माझा पूर्णांशाने स्वीकार केला आहे. स्वामींशी योग झाल्यानंतरही मी असमाधानीच राहिले. 
                त्यानंतर स्वामींनी माझे लक्ष जगामधील लोकांच्या दुःखांकडे वळवले. स्वामींवर असलेले माझे एकाग्र प्रेम त्यांनी जगाकडे वळवले. जगातील दुःख आणि भोग पाहून मी त्यांच्या मुक्तीसाठी अश्रू ढाळू लागले. जोपर्यंत संपूर्ण जागाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत मला मुक्ती नको, असे मी स्वामींना सांगितले. त्यावर भगवानांनी सर्वांना मुक्ती देण्याचे मला वचन दिले आणि म्हणाले," सत्य युग अवतरेल."


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

मोती दुसरा

७ जुलै २००१ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, जगामध्ये कधी परिवर्तन होणार ? साईंचे साम्राज्य मी कधी पाहणार ? सत्य युगाची पहाट  कधी होणार ? आणि या जगातील दुःखांचा अंत कधी होणार ? मला त्यासाठी तप केले पाहिजे. ते तप  करण्यासाठी, प्लिज तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव करा. 
स्वामी - तप, तप, तप सदैव तप. तू रात्री विश्वासाठी ढाळलेले अश्रूही तपच आहे. ' राम विग्रहवान धर्मा ' - राम मूर्तिमंत धर्म आहे. हे जसे म्हटले आहे. त्याप्रमाणे वसंता मूर्तिमंत तप आहे. असे म्हणता येईल. तप वसंतेचे रूप धारण करून आले आहे. जगातील लोकांसाठी ढाळत असलेले तुझे करुणामय अश्रू हेही तपच आहेत. 
वसंता - स्वामी, चांगुलपणाचे राज्य कधी येणार सांगाना ? भविष्याविषयी मला काही सांगा. 
स्वामी - येत्या काही वर्षात जगामध्ये सर्वत्र शांती असेल. सर्व देश अध्यात्माच्या मार्गावरून वाटचाल करतील. सूर्याप्रमाणे भारत जगाला मार्गदर्शन करेल. भारत ज्ञानसूर्य होऊन जगाची अज्ञानाच्या अंधकारातून मुक्तता करेल. ते कार्य तू करणार आहेस. सर्व देश भारताच्या छाया छत्राचा शोध घेत येतील. लोकं उच्च सत्यांविषयी जागृत होतील आणि त्यांची आध्यात्मिक तृष्णा जागृत होईल. ह्या मार्गावरील सर्वांना भारत मागदर्शन करेल. शांतीसाठी अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. ह्याचा त्यांना बोध होईल सर्वत्र शांती नांदेल. 
             लोकांना आध्यात्मिक मार्गावर सहाय्य करण्याची तीव्र उर्मी माझ्या मनात दाटून येते. त्यांच्यासाठी मी भगवानांकडे विलाप करते.  त्यांच्यासाठी अधिक तप करावे असे मला नेहमी वाटते. मला दररोज येणाऱ्या फोनवरून आणि पत्रांवरून जगामधील दुःखांची माहिती झाली. हे परमेश्वरा ! केवढी ही दुःख आणि वेदना ! केवढी हे कर्मांचे ओझे !ह्या कर्मांचा संहार कधी होणार ? लोकं शांतीची अनुभूती कधी घेणार ? ह्याच्यावर मार्ग शोधण्यासाठी मी परमेश्वराची प्रार्थना करते आहे. 
              स्वामी म्हणाले, " आजवर झालेल्या युगांमध्ये कोणीही समस्त जगाला अध्यात्माच्या मार्गावर आणून मुक्तीसाठी तयार केलेले नाही. आपल्या काळातच हे घडून येणार आहे. कोणताही दिव्य अवतार संपूर्ण पृथ्वीच्या मुक्तीसाठी आलेला नाही. माझ्या भगवानाप्रती असणाऱ्या प्रेमाची स्पंदने व त्यांचे माझ्याप्रती असणारे प्रेम ह्या दोन्हीच्या संयुक्त कृतीने जगामध्ये परिवर्तन घडेल. सर्वत्र चांगुलपणा आणि कुशलमंगल दिसून येईल. " 


.  .  . 

श्री वसंत साईंच्या ' मुक्ती इथेच या क्षणी ' भाग -३ ह्या पुस्तकातून 


जय साईराम  

गुरुवार, २२ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" शांती अंतर्यामी आहे, हे जाणणे हेच खरे ज्ञान ! "

प्रकरण चौदा 

वसंतमयम् 

२ ऑगस्ट २००३ ध्यान 
वसंता - स्वामी, एकदा समर कोर्समध्ये बोलताना तुम्ही म्हणालात," भक्ताची प्रेमशक्ती भगवंताच्या इच्छा शक्तीहुन, दैवी संकल्पाहून अधिक सामर्थ्यशाली असते. या प्रेम शक्तीपुढे भगवंताची इच्छाही निष्प्रभ ठरते. कृपया मला हे मला अधिक स्पष्ट करून सांगा ना. 
स्वामी - हे सत्य आहे. विश्व कर्माच्या पायावर कार्यरत असते. प्रत्येक घडणाऱ्या घटनेस कर्मफल कारणीभूत असते. परमेश्वराच्या हातामध्ये कर्माचा तराजू असतो. तू तुझ्या अनिर्बंध प्रेमापोटी वैश्विक मुक्ती मागत आहेस. तुझ्या या प्रेमाने मला जखडून टाकले आहे. त्यामुळे कर्माचा तराजू मी दूर फेकून दिला आहे. तुझ्या प्रेमामुळेच नूतन सत्य युग येत आहे. या सत्ययुगाचा निर्माता ब्रम्हदेव नसून, केवळ तुझ्या प्रेमामुळेच हे नवयुग उदयास येत आहे. सत्य म्हणजे अस्तित्व असणे तर प्रेम म्हणजे बनणे, प्रेम विस्तार आहे. 
ध्यान समाप्ती 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

 " निर्मल हृदयातून सत्य प्रकाशमान होते ."

भाग - तिसरा 

ज्ञानाची नवी कवाडे 

" जसे भावविश्व तसे जीवन ..... "
प्रकरण चौदा 

वसंतमयम् 

                           ' प्रत्येक जीव, वृक्षवल्ली, वाळू हे सर्व माझे अवयव आहेत. सागर आणि महासागर माझा पेहराव आहे. सूर्य आणि चंद्र माझे दोन नेत्र आहेत. पंचतत्वांपासून ज्ञानेंद्रिये बनली आहेत. मी सर्वव्याप्त आहे. सर्व विश्व भक्तीभावाने, शुद्ध प्रेमभावाने भरून उरले आहे. हे वसंतमयम् आहे. ' 

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

             अनेकांच्या मनात असा विचार येईल की एका सर्वसामान्य खेडवळ स्त्रीने चार वर्षांपूर्वी एक आश्रम सुरु करून स्तूप बांधला, ठीक आहे ! परंतु स्वामींच्या अवतारकार्यात याची कशी काय मदत होणार ?
              हा दगडांनी बांधलेला एक साधासुधा स्तंभ नाही किंवा एखाद्या शिल्पकाराचे शिल्पही नाही. माझे जीवन, भाव, मन, बुद्धी, चित्त, इंद्रिय हे सर्वकाही स्वामींशी एक झाले. स्वामींना केंद्रस्थानी ठेवून माझे भाव कृतीत उतरले. स्वामींचा अखंड ध्यास आणि त्यांच्यासाठी ढाळलेल्या अश्रूंनी माझ्या कुंडलिनीचे एक एक चक्र उघडले. अपवित्रतेचा एक कणही बाकी न ठेवता मी स्वतःस पवित्र केले. मी रिक्त झाले. ' मी ' विना ' मी ' झाले. या वसंतरूपी रिक्त घटामध्ये स्वामी स्वतःभरून राहिले आणि म्हणून माझे भाव, आम्हा दोघांचे स्वाभाविक गुण आणि भाव दोन्ही सूचित करतात. हा स्तूप म्हणजे आम्हा दोघांचे ऐक्य आहे. 
               स्तूप पूर्ण झाल्यांनतर मुक्ती निलयम सर्व योगांचे घर झाले; भक्ती, ज्ञान आणि परमेश्वराच्या उपासनेचे सर्व मार्ग यांचे केंद्र झाले. हा स्तूप दिव्य ऊर्जेचे आसन, मूल स्तंभ आहे. अनादीकालापासून अस्तित्वात असलेला ऊर्जा स्तोत्र. या स्तंभामध्ये संपूर्ण विश्वाला मुक्ती देण्याचे तसेच सत्ययुग आणण्याचे सामर्थ्य आहे. 
               माझ्या देहाद्वारे स्वामींचा संकल्प कसा कार्य करतो, हे हा स्तूप दर्शवतो. हा वैश्विक प्रेम आणि त्याग यांचे प्रतीक आहे. सत्याचा शोध घेणाऱ्या सर्वधर्मीयांना हा मार्गदर्शन करेल, सहाय्य करेल. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

महाशिवरात्रीचा संदेश  
               
              जेव्हा आपला विचार कृतीमध्ये उतरतो, तेव्हा प्रतिक्रिया उत्पन्न होते आणि आपल्याला त्याची फळे भोगावी लागतात. मनामध्ये विचार उद्भवल्याक्षणी जर तो थांबवला नाही तर मन त्याच्यासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण करते, जेथे आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. मनानी निर्माण केलेली परिस्थिती ही  स्वाभाविक परिस्थितीहून वेगळी असते. परिस्थितीस अनुकुल बनवणारे अधिकाधिक विचार उद्भवतात. अशा मनुष्याचे मन त्याचे समर्थन करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढते. 
               जर साधकाच्या मनात विचलित करणारे विचार उद्भवले तर आध्यात्मिक नियमांचे उल्लंघन करण्यासाठी मन अनेक कारणे पुढे करेल आणि ते कारण कसे बरोबर आहे, योग्य आहे हे दुसऱ्यास पटवून देईल. अशा तऱ्हेने मन बुद्धीला फसवते. अशा वेळी बुद्धी मन सांगेल ते ऐकते. निर्णय होतो आणि त्यातून कृतिघडते. अशा तऱ्हेने माया साधकाचा ताबा घेते. 
               ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या गोष्टींची मनात इच्छा निर्माण होते. त्या आपल्याकडे असाव्यात असे तीव्रतेने वाटू लागते व त्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. एकदा ती वस्तू मिळाली की त्याची इच्छा संपते व त्यानंतर मन दुसऱ्या वस्तूकडे वळते. असे हे चक्र अव्याहतपणे चालू राहते. 
               जर आपण प्रत्येक गोष्ट ईश्वराकडे वळवली तर ती विश्वकल्याणकारी बनते आणि जर आपण प्रत्येक गोष्ट भौतिक जगताकडे वळवली तर ती आपल्या पुढील जन्माचे कारण बनते. आपले भाव आपल्या बंधास कारणीभूत होतात. आपल्या अतृप्त इच्छा आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतो. आपले भाव आणि विचारांचे खोलवर संस्कार बनतात आणि तेच आपला पुढील जन्म निश्चित करतात. आणि आपण जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो.  
               प्रथम भाव निर्माण होतात, त्या भावांमधून विचार बनतात मनामध्ये विचार आल्या क्षणीच आपण तो तपासून पाहिला पाहिजे की तो सुविचार आहे का कुविचार. त्यातील कुविचारांचे कृतीमध्ये रूपांतर होण्याअगोदर आपण ते मनातून हद्दपार केले पाहिजे. अन्यथा आपल्याला दुःखास सामोरे जाणे भाग पडेल. 


श्री वसंत साईंच्या The Principle Of Becoming God ह्या पुस्तकातून.  




जय साईराम        

रविवार, ११ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" परमेश्वर सत्यस्वरूप आहे."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

                 उद्घाटनानंतर ४८ दिवसांनी आम्ही प्राणप्रतिष्ठा मंडल पूजा केली. स्वामींनी साडी घेण्यासाठी मला पैसे देऊन साडीचे डिझाईन, काठ, रंग या सर्वांचे वर्णनही सांगितले होते. याच दरम्यान स्वामींनी पुट्टपर्तीमध्ये आणि त्यांनतर चेन्नईमध्ये अतिरुद्र महायज्ञ केला. स्वामींनी याविषयी एक कविता दिली. 

जन्मताच आरंभलास प्रेमयज्ञ तू 
हृदय तुझे यज्ञकुंड
रुद्रयज्ञ करीतो मी सकलजनांसाठी 
ते न जाणती तुझ्या प्रेमाची महती 
दर्शवितो पावित्र्य तुझे बाह्य जगती 
रुद्र यज्ञ करीतो मी 


धग तुझ्या हृदयकुंडाची सोसवेना मला 
थरथरतो देह माझा 
यथाकाल होईल सारे क्षेमकुशल 
देहही होतील आपुले सक्षम, सबल 

***

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 
   

गुरुवार, ८ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " माया सत्यावर आवरण घालते. ऐकोहम् बहुस्यामी (एकातून अनेकत्व ) हे सत्य जाणून घ्या."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

स्वामींनी दाखवलेले दिव्य दृश्य 

                आकाशी रंगाची साडी नेसून १६ वसंता १६ यज्ञकुंडांसमोर बसून यज्ञ करत आहेत. १६ वसंता वर चढून कलशांमधून स्तूपाला अभिषेक करत आहेत. 
ध्यान समाप्ती 
                 हा स्तूप माझी कुंडलिनी आहे. माझे भाव स्तूप ग्रहण करतो आणि एखाद्या ट्रान्समीटरप्रमाणे बाहेरच्या जगामध्ये प्रसारित करतो. हे भाव सर्वत्र पसरतात आणि जगामध्ये परिवर्तन घडवून आणतात. जेव्हा जीव कारण देहाच्याही पलीकडे जातो, तेव्हा अवकाश म्हणजे संपूर्ण विश्व त्याचा देह बनते. ह्या जीवाचे निदर्शन आकाशी साडी व त्यावरील चांदण्या करतात. 
               वसंता नावाचा जीव साधना करून कारण देहाच्याही पलीकडे गेला आणि तिने वैश्विक देह धारण केला. म्हणून हा स्तूप वैश्विक कुंडलिनी आहे. मी वैश्विक मुक्तीचे कारण आहे. संपूर्ण जग वसंतमयम व्हावे अशी माझी इच्छा होती. वसंता विश्व झाली. यज्ञ करणारी मी आहे. समिधा म्हणून यज्ञामध्ये माझे भाव अर्पण केल्या जात आहेत. स्तूपाच्या रूपात असलेल्या मला मी ते अर्पण करत आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम 

रविवार, ४ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

         " मनुष्याने त्याचे भाव, विचार आणि विवेक आध्यात्मिक ध्येयावर केंद्रित केल्यास त्याला ज्ञान प्राप्त होते. "

प्रकरण तेरा 

 मुक्ती स्तूप 

२ सप्टेंबर २००६ ध्यान - दुपारी १२:३०
वसंता - तुम्ही म्हणालात की मी येईन, पण तुम्ही आला नाहीत. 
स्वामी - तू मला कुठे शोधत आहेस ? मी फक्त या रुपापुरता मर्यादित आहे का ? तू माझे सर्वव्यापक रूप पाहतेस, हो ना ? एका धुलीकणापासून ते ब्रम्हापर्यंत सर्वांमध्ये तू मला पाहिलेस. 
वसंता - स्वामी, तुम्ही मला मंगळसूत्र देण्याचं वचन दिलं होतं. 
स्वामी - मी तुला मंगळसूत्र तरी कसं देऊ ? तू प्रकृती आहेस. सर्वव्यापक प्रकृतीसाठी कोणते मंगळसूत्र द्यायचे ? म्हणून मी तुला सांगितले की तू जेव्हा निळी साडी नसशील तेव्हा मी मंगळसूत्र देईन. आकाशी निळा रंग तुझ्या वैश्विक देहाचे प्रतीक आहे. आता तुझे सर्व कार्य पार पडले, हा स्तूप तुझे कार्य पुढे चालवेल. 
वसंता - स्वामी, माझे प्रभू, मला हे सहन होत नाहीय. तुम्ही सर्व काही अतिउत्तमरित्या पूर्णत्वास नेलेत. 
स्वामी -  तुला खूप काळजी लागून आली होती नं ? आता तू आनंदात रहा आणि पहा काय घडतंय ते !

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साई राम 

गुरुवार, १ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

          " मनुष्याने त्याचे भाव, विचार आणि विवेक आध्यात्मिक ध्येयावर केंद्रित केल्यास त्याला ज्ञान प्राप्त होते." 

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

                " मी एका मागोमाग एक कलश घेऊन पवित्र जलाचा अभिषेक चालूच ठेवला. महालक्ष्मीचा कलश सगळ्यात शेवटी आणला गेला. त्यातील पवित्र जल मी चांदणीवर ओतल्यावर माझे अंग थरथर कापत होते. डोळ्यांमधून अश्रूंच्या सरीवर सरी ओघळत होत्या. वरतून चारही दिशांना असलेली लोकांची गर्दी माझ्या दृष्टीस पडत होती. स्वामी, या सर्व लोकांचा कर्मसंहार करून त्यांना मुक्ती द्या."

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम