ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
महाशिवरात्रीचा संदेश
जेव्हा आपला विचार कृतीमध्ये उतरतो, तेव्हा प्रतिक्रिया उत्पन्न होते आणि आपल्याला त्याची फळे भोगावी लागतात. मनामध्ये विचार उद्भवल्याक्षणी जर तो थांबवला नाही तर मन त्याच्यासाठी अनुकुल परिस्थिती निर्माण करते, जेथे आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. मनानी निर्माण केलेली परिस्थिती ही स्वाभाविक परिस्थितीहून वेगळी असते. परिस्थितीस अनुकुल बनवणारे अधिकाधिक विचार उद्भवतात. अशा मनुष्याचे मन त्याचे समर्थन करण्यासाठी वेगवेगळे मार्ग शोधून काढते.
जर साधकाच्या मनात विचलित करणारे विचार उद्भवले तर आध्यात्मिक नियमांचे उल्लंघन करण्यासाठी मन अनेक कारणे पुढे करेल आणि ते कारण कसे बरोबर आहे, योग्य आहे हे दुसऱ्यास पटवून देईल. अशा तऱ्हेने मन बुद्धीला फसवते. अशा वेळी बुद्धी मन सांगेल ते ऐकते. निर्णय होतो आणि त्यातून कृतिघडते. अशा तऱ्हेने माया साधकाचा ताबा घेते.
ज्या गोष्टी आपल्याकडे नाहीत त्या गोष्टींची मनात इच्छा निर्माण होते. त्या आपल्याकडे असाव्यात असे तीव्रतेने वाटू लागते व त्या मिळवण्यासाठी प्रयत्न सुरु होतात. एकदा ती वस्तू मिळाली की त्याची इच्छा संपते व त्यानंतर मन दुसऱ्या वस्तूकडे वळते. असे हे चक्र अव्याहतपणे चालू राहते.
जर आपण प्रत्येक गोष्ट ईश्वराकडे वळवली तर ती विश्वकल्याणकारी बनते आणि जर आपण प्रत्येक गोष्ट भौतिक जगताकडे वळवली तर ती आपल्या पुढील जन्माचे कारण बनते. आपले भाव आपल्या बंधास कारणीभूत होतात. आपल्या अतृप्त इच्छा आकांक्षांची पूर्ती करण्यासाठी आपण पुन्हा पुन्हा जन्म घेतो. आपले भाव आणि विचारांचे खोलवर संस्कार बनतात आणि तेच आपला पुढील जन्म निश्चित करतात. आणि आपण जन्म मृत्यूच्या चक्रात अडकतो.
प्रथम भाव निर्माण होतात, त्या भावांमधून विचार बनतात मनामध्ये विचार आल्या क्षणीच आपण तो तपासून पाहिला पाहिजे की तो सुविचार आहे का कुविचार. त्यातील कुविचारांचे कृतीमध्ये रूपांतर होण्याअगोदर आपण ते मनातून हद्दपार केले पाहिजे. अन्यथा आपल्याला दुःखास सामोरे जाणे भाग पडेल.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा