शुक्रवार, २३ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

मोती दुसरा

७ जुलै २००१ सकाळचे ध्यान 
वसंता - स्वामी, जगामध्ये कधी परिवर्तन होणार ? साईंचे साम्राज्य मी कधी पाहणार ? सत्य युगाची पहाट  कधी होणार ? आणि या जगातील दुःखांचा अंत कधी होणार ? मला त्यासाठी तप केले पाहिजे. ते तप  करण्यासाठी, प्लिज तुम्ही माझ्यावर कृपेचा वर्षाव करा. 
स्वामी - तप, तप, तप सदैव तप. तू रात्री विश्वासाठी ढाळलेले अश्रूही तपच आहे. ' राम विग्रहवान धर्मा ' - राम मूर्तिमंत धर्म आहे. हे जसे म्हटले आहे. त्याप्रमाणे वसंता मूर्तिमंत तप आहे. असे म्हणता येईल. तप वसंतेचे रूप धारण करून आले आहे. जगातील लोकांसाठी ढाळत असलेले तुझे करुणामय अश्रू हेही तपच आहेत. 
वसंता - स्वामी, चांगुलपणाचे राज्य कधी येणार सांगाना ? भविष्याविषयी मला काही सांगा. 
स्वामी - येत्या काही वर्षात जगामध्ये सर्वत्र शांती असेल. सर्व देश अध्यात्माच्या मार्गावरून वाटचाल करतील. सूर्याप्रमाणे भारत जगाला मार्गदर्शन करेल. भारत ज्ञानसूर्य होऊन जगाची अज्ञानाच्या अंधकारातून मुक्तता करेल. ते कार्य तू करणार आहेस. सर्व देश भारताच्या छाया छत्राचा शोध घेत येतील. लोकं उच्च सत्यांविषयी जागृत होतील आणि त्यांची आध्यात्मिक तृष्णा जागृत होईल. ह्या मार्गावरील सर्वांना भारत मागदर्शन करेल. शांतीसाठी अध्यात्म हा एकमेव मार्ग आहे. ह्याचा त्यांना बोध होईल सर्वत्र शांती नांदेल. 
             लोकांना आध्यात्मिक मार्गावर सहाय्य करण्याची तीव्र उर्मी माझ्या मनात दाटून येते. त्यांच्यासाठी मी भगवानांकडे विलाप करते.  त्यांच्यासाठी अधिक तप करावे असे मला नेहमी वाटते. मला दररोज येणाऱ्या फोनवरून आणि पत्रांवरून जगामधील दुःखांची माहिती झाली. हे परमेश्वरा ! केवढी ही दुःख आणि वेदना ! केवढी हे कर्मांचे ओझे !ह्या कर्मांचा संहार कधी होणार ? लोकं शांतीची अनुभूती कधी घेणार ? ह्याच्यावर मार्ग शोधण्यासाठी मी परमेश्वराची प्रार्थना करते आहे. 
              स्वामी म्हणाले, " आजवर झालेल्या युगांमध्ये कोणीही समस्त जगाला अध्यात्माच्या मार्गावर आणून मुक्तीसाठी तयार केलेले नाही. आपल्या काळातच हे घडून येणार आहे. कोणताही दिव्य अवतार संपूर्ण पृथ्वीच्या मुक्तीसाठी आलेला नाही. माझ्या भगवानाप्रती असणाऱ्या प्रेमाची स्पंदने व त्यांचे माझ्याप्रती असणारे प्रेम ह्या दोन्हीच्या संयुक्त कृतीने जगामध्ये परिवर्तन घडेल. सर्वत्र चांगुलपणा आणि कुशलमंगल दिसून येईल. " 


.  .  . 

श्री वसंत साईंच्या ' मुक्ती इथेच या क्षणी ' भाग -३ ह्या पुस्तकातून 


जय साईराम  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा