ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" तुमच्या भावभावनांनी केवळ परमेश्वराला स्पर्श केला पाहिजे, अन्य कशालाही नाही."
प्रकरण चौदा
वसंतमयम्
" माझ्या प्रेमाने सर्व जीवांमध्ये प्रवेश केला पाहिजे. माझे प्रेम सर्वत्र ओसंडून वाहत आहे, विस्तारत आहे, सर्व विश्व व्यापून टाकत आहे. मी माझ्या प्रेमाने संपूर्ण विश्वामध्ये प्रेम घडवून आणेन. माझे प्रेम सर्वांमध्ये प्रवेश करून त्यांच्याद्वारे कार्य करेल."
असा विचार करता करता, माझ्या बाजूला बसलेल्या स्वामींचाही मला विसर पडला ! असे हे विचार बाह्य जगतात पाठवण्याच्या नादात मी गढून गेले. हे विचार बाह्य जगतात पाठवण्याखेरीज मी दुसरे काहीही करण्याची गरज नाही, एवढेच पुरेसे आहे असे मला वाटत होते. लिहिणे वैगैरे कशाचीही गरज नाही.
स्वामींनी मला १९९७ मध्येच सांगितले, की मी जीवनमुक्त अवस्थेमध्ये आहे आणि त्यांनी माझा पूर्णांशाने स्वीकार केला आहे. स्वामींशी योग झाल्यानंतरही मी असमाधानीच राहिले.
त्यानंतर स्वामींनी माझे लक्ष जगामधील लोकांच्या दुःखांकडे वळवले. स्वामींवर असलेले माझे एकाग्र प्रेम त्यांनी जगाकडे वळवले. जगातील दुःख आणि भोग पाहून मी त्यांच्या मुक्तीसाठी अश्रू ढाळू लागले. जोपर्यंत संपूर्ण जागाला मुक्ती मिळत नाही तोपर्यंत मला मुक्ती नको, असे मी स्वामींना सांगितले. त्यावर भगवानांनी सर्वांना मुक्ती देण्याचे मला वचन दिले आणि म्हणाले," सत्य युग अवतरेल."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा