गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" देहभावाचा त्याग केल्यानंतर सत्याचा साक्षात्कार होऊ शकतो."

प्रकरण तेरा 

मुक्ती स्तूप 

             अनेकांच्या मनात असा विचार येईल की एका सर्वसामान्य खेडवळ स्त्रीने चार वर्षांपूर्वी एक आश्रम सुरु करून स्तूप बांधला, ठीक आहे ! परंतु स्वामींच्या अवतारकार्यात याची कशी काय मदत होणार ?
              हा दगडांनी बांधलेला एक साधासुधा स्तंभ नाही किंवा एखाद्या शिल्पकाराचे शिल्पही नाही. माझे जीवन, भाव, मन, बुद्धी, चित्त, इंद्रिय हे सर्वकाही स्वामींशी एक झाले. स्वामींना केंद्रस्थानी ठेवून माझे भाव कृतीत उतरले. स्वामींचा अखंड ध्यास आणि त्यांच्यासाठी ढाळलेल्या अश्रूंनी माझ्या कुंडलिनीचे एक एक चक्र उघडले. अपवित्रतेचा एक कणही बाकी न ठेवता मी स्वतःस पवित्र केले. मी रिक्त झाले. ' मी ' विना ' मी ' झाले. या वसंतरूपी रिक्त घटामध्ये स्वामी स्वतःभरून राहिले आणि म्हणून माझे भाव, आम्हा दोघांचे स्वाभाविक गुण आणि भाव दोन्ही सूचित करतात. हा स्तूप म्हणजे आम्हा दोघांचे ऐक्य आहे. 
               स्तूप पूर्ण झाल्यांनतर मुक्ती निलयम सर्व योगांचे घर झाले; भक्ती, ज्ञान आणि परमेश्वराच्या उपासनेचे सर्व मार्ग यांचे केंद्र झाले. हा स्तूप दिव्य ऊर्जेचे आसन, मूल स्तंभ आहे. अनादीकालापासून अस्तित्वात असलेला ऊर्जा स्तोत्र. या स्तंभामध्ये संपूर्ण विश्वाला मुक्ती देण्याचे तसेच सत्ययुग आणण्याचे सामर्थ्य आहे. 
               माझ्या देहाद्वारे स्वामींचा संकल्प कसा कार्य करतो, हे हा स्तूप दर्शवतो. हा वैश्विक प्रेम आणि त्याग यांचे प्रतीक आहे. सत्याचा शोध घेणाऱ्या सर्वधर्मीयांना हा मार्गदर्शन करेल, सहाय्य करेल. 


उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम     

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा