ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" शांती अंतर्यामी आहे, हे जाणणे हेच खरे ज्ञान ! "
प्रकरण चौदा
वसंतमयम्
२ ऑगस्ट २००३ ध्यान
वसंता - स्वामी, एकदा समर कोर्समध्ये बोलताना तुम्ही म्हणालात," भक्ताची प्रेमशक्ती भगवंताच्या इच्छा शक्तीहुन, दैवी संकल्पाहून अधिक सामर्थ्यशाली असते. या प्रेम शक्तीपुढे भगवंताची इच्छाही निष्प्रभ ठरते. कृपया मला हे मला अधिक स्पष्ट करून सांगा ना. स्वामी - हे सत्य आहे. विश्व कर्माच्या पायावर कार्यरत असते. प्रत्येक घडणाऱ्या घटनेस कर्मफल कारणीभूत असते. परमेश्वराच्या हातामध्ये कर्माचा तराजू असतो. तू तुझ्या अनिर्बंध प्रेमापोटी वैश्विक मुक्ती मागत आहेस. तुझ्या या प्रेमाने मला जखडून टाकले आहे. त्यामुळे कर्माचा तराजू मी दूर फेकून दिला आहे. तुझ्या प्रेमामुळेच नूतन सत्य युग येत आहे. या सत्ययुगाचा निर्माता ब्रम्हदेव नसून, केवळ तुझ्या प्रेमामुळेच हे नवयुग उदयास येत आहे. सत्य म्हणजे अस्तित्व असणे तर प्रेम म्हणजे बनणे, प्रेम विस्तार आहे.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा