रविवार, २८ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

" वैराग्य सर्व इच्छांचा नाश करते आणि मनुष्याला रिक्त करते. " 
 
प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

               सत्य युगामध्ये भगवंताला भूतलावर येण्याची गरज नसते. आधीच्या सत्य युगामध्ये भगवंत अवतरला नाही. मी राधा, सीता आणि आंडाळ यांच्या मनातील परमेश्वराविषयी असणारी तळमळ, ध्यास घेऊन आले आणि एकाग्र साधना केली म्हणून सत्य युगामध्ये प्रेम साई अवतार अवतरणार आहे. 
               स्वामी म्हणाले, 
              " काम, विवाह आणि अपत्य जन्म या तीन गोष्टींमुळे निर्मिती होते. हे दोषरहित करण्यासाठी आम्ही आलो आहोत. म्हणून तुला पुनःपुन्हा अनुभव येत आहेत. या तिन्हीच्या शुद्धीकरणाने सृष्टी निर्मळ होईल. या नूतन पवित्र सृष्टीमुळे सत्य युग विकसित होईल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

गुरुवार, २५ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

         " तुम्ही पुन्हा पुन्हा तुमच्या जन्माची निर्मिती करता. तुमचे भाव तुम्हाला जन्ममृत्युच्या चक्रात अडकवतात. "
प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

              प्रेम साई अवतारामध्ये आंडाळ, सीता आणि राधा यांचे भाव आणि प्रभाव रूप धारण करून क्रियाशील बनतील. त्यांची भक्ती आणि परमेश्वराशी संयुक्त होण्याची तृष्णा हेच सत्ययुगाचे बीज आहे. मी आंडाळ आहे, मी सीता आहे, मी राधा आहे. माझ्यामध्ये असलेल्या त्यांच्या प्रभावामुळे मला परमेश्वरप्राप्तीची तळमळ लागली आहे. 
* माझ्या मनात रुजलेल्या आंडाळच्या ठशांमुळे मी प्रेमसाई अवतारात स्वामींशी विवाह करणार आहे. 
* माझ्यावर असणाऱ्या सीतेच्या खोल प्रभावामुळे मी सुखी कौटुंबिक जीवन जगेन आणि आम्हाला एक अपत्य असेल. 
* माझ्या मनातील राधेच्या खोल ठशांमुळे, मी सर्व निर्मितीमध्ये प्रवेश करून स्वतः साई कृष्णाशी, मूळ पुरुषाशी संयुक्त होईन. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः


मोती दहावा


              आपण सकाळपासून रात्रीपर्यंत कामात व्यस्त असतो. धावपळीच्या जीवनात आपण अगदी थोडी विश्रांती घेतो. या सर्व धकाधकीतून आपण काय मिळवतो ? बायको, मुले, अधिकारपद आणि थोडीशी मालमत्ता. यासाठी आपण किती धडपड करतो. कित्येक वेळा दैवाला दोष देतो आणि मनःशांती हरवून बसतो. जीवनात जराही शांती नाही. यातून सुटका मिळवण्यासाठी माणूस सिनेमाला जातो, मित्रांना भेटतो कादंबऱ्या, मासिके वाचतो. हे सर्व तात्पुरते उपाय आहेत. काही काळ कदाचित तो त्याची दुःख विसरेल, पण घरी परतल्यावर ती पुन्हा त्याच्या मानगुटीवर बसतील. माणसांनी कायमस्वरूपी उपाय शोधला पाहिजे. सखोल चिंतन केल्यावर तुम्हाला याच उत्तर सापडेल. जेव्हा तुम्ही सर्व कर्म परमेश्वराची पूजा म्हणून कराल तेव्हाच तुम्हाला खरी मनः शांती मिळेल.
               आपण स्वतःला सर्व बंधनातून मुक्त करण्यासाठीच जन्मास आलो आहोत. सगळी कर्म योगात परिवर्तित करून आपण मुक्ती प्राप्त करू शकतो. कोण कोणाचा नातेवाईक ? कौटुंबिक जीवन हे आगगाडीच्या प्रवासाप्रमाणे आहे. ट्रेनच्या प्रवाशांप्रमाणेच कुटुंबात सर्वजण एकत्र येतात; ते कर्मांनुसार एकमेकांना जोडलेले असतात. एकमेकांचे ऋण फेडले की ते वेगवेगळ्या मार्गांनी जातात. त्या कुटुंबात असेपर्यंत प्रत्येकाने बंधनात न अडकता आपली कर्तव्ये परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेनी पार पाडावी.
               सर्व नाती फसवी आहेत. फक्त परमेश्वर शाश्वत आहे. तोच आपला खराखुरा नातलग आहे. त्यालाच आपला समजून कर्म करीत राहणं हाच कर्मयोग आहे. ' मी कर्ता आहे ' या भावनेने केलेल्या कर्माचे पाश होतात, परमेश्वराला अर्पण करण्याच्या भावनेने केलेल्या कर्माचा योग्य होतो.
              माझ्या ' योगसूत्र ' या पुस्तकात मी आपल्या रोजच्या साध्या कृती आणि गोष्टी योगामध्ये परिवर्तन करण्याचे सोपे मार्ग सांगितले आहेत. सर्वांमध्ये फक्त परमेश्वरच वास करीत आहे हे सत्य एकदा जाणलंत की तुम्ही सगळ्या गोष्टी परमेश्वराशी जोडण्यातील आनंद अनुभवाल. दरवाजा, एक सामान्य दरवाजाच मानलात तर त्यातून काहीच आनंद मिळणार नाही. पण तीच वस्तू परमेश्वराशी जोडण्यासाठी असून असा विचार कराल की ' हा मोक्षाचा दरवाजा आहे ', तर मग तुम्हाला आनंद मिळेल. तुम्ही प्रत्येक व्यक्ती, वस्तू किंवा घटना परमेश्वराशी जोडू शकता. मी लहानपणी आमच्या खोलीतील प्रत्येक वस्तू परमेश्वराशी जोडत असे. दिवाणखान्यातील खांब हा प्रल्हादाला वाचवण्यासाठी प्रकट होणाऱ्या नृसिंहावताराचा खांब होत असे. खोलीच्या मध्यभागी असणारा झोपाळा हा राधाकृष्णासाठी असे. अशाप्रकारे मी सर्वकाही परमेश्वराशी जोडण्याची स्वतःला सवय लावून घेतली.
               तुम्ही अगदी रोजची घरगुती कामं दिव्यत्वाशी जोडलीत, तर तुम्हाला अवजड कमाचेसुद्धा ओझे वाटणार नाही.
              अशाप्रकारे मी भौतिक अर्थ तोडून सर्व गोष्टी परमेश्वराशी जोडण्याची सवय लावून घेतली. माणसाने ' तोडणे आणि जोडणे ' च्या सरावाची प्रयत्नपूर्वक सवय करून घ्यायला हवी. त्यामुळे तुम्ही जे काही बघता, ऐकता किंवा करता, ते आपोआपच परमेश्वराशी जोडता.
              माझी कर्म मला स्पर्श करीत नाहीत अथवा मला त्यांचा त्रास होत नाही. मला त्यांचं ओझं वाटत नाही त्यामुळे मी माझी कामं विनासायास करू शकते. माझं मन शांत, समतोल असतं. मी जीवनात, नदीत तरंगणाऱ्या ओंडक्याप्रमाणे स्वछंद फिरते. मी कशालाही स्पर्श करत नाही. कारण माझ्यात ' मी ' नाही, अहंकार नाही. मला काही स्पर्श करीत नाही आणि मी कशालाही स्पर्श करीत नाही, त्यामुळे माझ्या मनावर कुठलेही संस्कार नाहीत. हा माझा स्वभाव जन्ममूत्युच्या चक्रात न अडकलेल्या स्वछंद पक्ष्यासारखा आहे. 

संदर्भ - श्री वसंत साईंच्या ' कर्म कायद्यावर उपाय ' ह्या पुस्तकातून.

जय साईराम
ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः


जन्मदिन संदेश


 सर्वसंग परित्याग केल्यानंतरच मोक्ष प्राप्ती होऊ शकते.
              त्यागाशिवाय कोणालाही मुक्ती मिळणे शक्य नाही. मुक्ती मिळवणे ही काही साधी सोपी गोष्ट नव्हे. जर तुमचा एक पाय भौतिक जीवनात आणि एक पाय आध्यात्मिक जीवनात असेल तर तुम्हाला कधीही मोक्षप्राप्ती होणार नाही. असे करत असाल तर ती केवळ स्वतःची फसवणूक ठरेल. तुम्ही तुमच्या बायको, मुले तसेच अर्थार्जन करण्यासाठी त्याग करायला तयार असता मग तुम्ही तुमच्या आध्यात्मिक जीवनासाठी त्याग का करू शकत नाही ? भौतिक जीवन म्हणजे ' जनन मरण ' व्याधी आहे. भवरोग आहे. हा कधीही बरा न होणार रोग आहे. जर तुम्हाला काही आजार झाला तर तुम्ही डॉक्टरांकडे जाता व त्यांनी लिहून दिलेली औषधे घेता. त्यांनी सांगितलेली सर्व खाण्यापिण्याची पथ्ये पाळता, सूचना पाळता. तुमचा भवरोग बरा करण्यासाठी महामहिम डॉक्टर भगवान श्री सत्य साईबाबा येथे आले. मग त्यांनी लिहून दिलेली औषधे तुम्ही का घेत नाही ? त्यांनी सुचवलेले उपचार जर तुम्ही घेतलेत तर तुमची जन्ममृत्युच्या फेऱ्यातून मुक्तता होईल. त्यागरूपी औषध घेतल्याशिवाय तुम्हाला कधीही, काहीही प्राप्त होणार नाही. त्याग हे आध्यात्मिक जीवनाच्या वाटचालीचे पहिले पाऊल आहे. तसेच आध्यात्मिक जीवनाचा आधारस्तंभ आहे. अनासक्त भावनेने तुम्ही तुमची कर्तव्ये बजावली पाहिजेत. परमेश्वर तुम्हाला संन्यास घेण्यास सांगत नाही. तुम्ही जीवनाच्या ज्या कोणत्या अवस्थेत आहात, त्यातील सर्व गोष्टींविषयी असणाऱ्या आसक्तीचा त्याग केलात तर तुम्हाला निश्चित परमेश्वर प्राप्ती होईल.
  ⃦⃦ न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनौके अमृतत्व मानशुः   ⃦
            कर्म, संतती वा धन ह्या कोणत्याही गोष्टीने अमरत्व प्राप्त होत नाही.
            भगवान सत्यसाईंनीही हेच सांगितले. मायेमधून जागे व्हा. सर्व अशाश्वत आहे. परमेश्वरासाठी मी माझ्या जीवनात सर्व गोष्टींचा त्याग केला. त्यानंतर वैश्विक मुक्तीसाठी मी मला प्राप्त झालेल्या परमेश्वराचाही त्याग केला.

श्री वसंतसाई



जय साईराम

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

         " तुम्ही तुमचे सर्व भाव ईश्वराभिमुख केले पाहिजे ज्यामुळे तुम्हाला चांगल्या फलांची प्राप्ती होईल. केवळ हेच तुम्हाला मुक्ती प्रदान करेल. "

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

              राधाकृष्णाच्या प्रेमामध्ये देहभावाचा मागमूसही नव्हता. तसेही ते कोणत्याही प्रकारे सामान्य सांसारिक जीवनाशी संबंधित नव्हते. त्यांचे दिव्य प्रेम आहे. परमेश्वरावरील विशुद्ध प्रेम दर्शवण्यासाठीच  ते पुन्हा आले आहेत. राधाकृष्णाचे प्रेम मधुर भक्तीच्याही पलीकडे आहे. ही परम योग स्थिती आहे. द्वापारयुगामध्ये हे ऐक्य भावविश्वाच्या स्तरावरच थांबले. आता ह्या भावविश्वाने रूप धारण केले आहे आणि संसाररूपी महासागरातून लोकांची सुटका करणार आहे. ह्या ऐक्यामुळेच सत्ययुग येणार आहे. नवनिर्मितीमधील सर्वांना राधाकृष्णाचे प्रेम वेढून टाकेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम

गुरुवार, १८ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

            " आपल्या अतृप्त इच्छा, आकांशा व आसक्ती पुढील जन्मात आपल्या बरोबर असतात."

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार

              राधा कृष्णाचे प्रेम शारीरिक स्तरावर पाहिले जाते. राधेला कृष्ण जिथे जिथे असेल तिथे त्याच्याशी एकतानता हवी आहे. तिला कृष्णाशी विवाह करून अपत्यप्राप्ती नको होती. तिला कृष्णाच्या सर्वव्यापी रूपाशी एकरूप व्हायचे होते. ही राधा आहे. तिचे तप, तिचे अश्रू सारं काही केवळ या ऐक्याकरता होते. ह्या ऐक्यामध्ये देहभाव येतो कुठे ? राधाकृष्णाचे प्रेम देहभावाशी निगडित होते का ? जर तसे असते तर लग्न करून ते सर्वसामान्य आयुष्य जगले असते. ज्या कृष्णाने रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्याशी लग्न केले तो राधेशीही विवाह करू शकला असता. त्याने तिला राजकन्येचा जन्म देऊन तो तिच्याशी विवाह करू शकला असता. परंतु त्याने तसे का केले नाही ? पमेश्वराला हे करणं अशक्य आहे का ?

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम
 

रविवार, १४ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार 

         " आपल्या भावविचारांनी मनावर झालेले खोलवर संस्कार आपला पुढील जन्म ठरवतात." 

प्रकरण पाच 

प्रेम साई अवतार 

                श्री सत्य साई बाबांच्या रूपात आलेला भगवंत ही स्वप्ने सत्यात आणत आहे. त्यांनी सांगितलेय की ते सत्य युगात प्रेमसाई बनून येतील, तेव्हा आमचा विवाह होईल. 
               प्रेम साई अवतारामध्ये प्रसूतीच्या वेळेस स्वामींनी माझ्याबरोबर असावे, अशी माझी इच्छा आहे. स्वामी म्हणाले, की सीतेच्या मनामधील खोल ठशांमुळे माझ्या मनामध्ये ही इच्छा आहे. सीतामाईला गर्भवती असताना अरण्यामध्ये सोडण्यात आले होते. स्वामी म्हणाले की पुढील अवतारात प्रसूतीच्या वेळी ते माझ्याबरोबर असतील व त्यावेळी एक अभूतपूर्व घटना घडेल. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साई राम

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

           " आपला मृत्यू, त्याचे ठिकाण आणि वेळ ही अगोदरच निश्चित केलेली असते व त्यानुसार ते घडते. यामध्ये कोणीही बदल करू शकत नाही."

भाग पाचवा 

प्रेम साई अवतार 

               आंडाळ परमेश्वराशी विवाह करण्याचे स्वप्न पहात होती. परमेश्वरमध्ये सदेह विलीन होण्याची तिला तळमळ लागली होती. आंडाळाची भक्ती पाहून परमेश्वर प्रसन्न झाला. त्याने तिला नववधूचा शृंगार करून मंदिरामध्ये बोलवले व तिला स्वतःमध्ये विलीन करून घेतले. आंडाळचे परमेश्वराशी मीलन झाले खरे, पण तिने स्पष्टपणे पाहिलेली विवाहविधींची स्वप्ने सत्यात उतरली नाहीत. दैवी कायद्यानुसार परमेश्वराला साधकाच्या साधनेचे फळ द्यावेच लागते. त्याला आपल्या भक्तांच्या मनोकामना पुऱ्या कराव्याच लागतात. म्हणूनच मी आंडाळचे संस्कार घेऊन जन्माला आले आणि लहानवयापासूनच परमेश्वराशी विवाह करण्याची स्वप्ने पाहू लागले. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम  

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

" जर ज्ञान आचरणात आणले नाही तर ते अपूर्ण ठरते. "

भाग पाचवा

प्रेम साई अवतार

              स्वामींनी या प्रश्नांची उत्तरे दिली, ते म्हणाले," तुझ्यामध्ये आंडाळ, सीता आणि राधा यांचे खोलवर रुजलेले ठसे आहेत. तिघींच्या विरहवेदना तू सोसते आहेस. त्यांचे माझ्यावर असलेले ऋण मी तुझ्याद्वारे फेडणार आहे. जेव्हा प्रेम साई अवतारात आपण राजा आणि प्रेमा बनून येऊ, तेव्हा तू पूर्ण ऐक्याचा आनंद अनुभवशील, तसेच आदर्श कौटुंबिक जीवनाचाही अनुभव घेशील. "
               बालपणापासूनच मला आंडाळसारखे बनून कृष्णाशी लग्न करायचे होते. अनेक वर्षांच्या कालावधीनंतर स्वामींनी सांगितले. की मी राधा आहे. राधा कृष्णाच्या विरहवेदना मी भोगते आहे. स्वामींनी मला माझे भाव कृतीत उतरवण्यास सांगितले. तसेच जयदेवांच्या गीत गोविंदम् विषयी लिहिण्यास सांगितले. त्यानुसार मी लिहिले. पुस्तकाचे नाव ठेवले ' पुन्हा गीत गोविंदम् ' जयदेवांची कृष्णाप्रती असणारी भक्ती म्हणजे राधा -भाव, मधुर भाव - भक्ती. मधुर भाव परमेश्वराला प्रेमाने जखडून ठेवतो. याला ' चिन्मय रस ' असे म्हणतात. म्हणजेच दिव्य जागृतीचा अमृतरस. आपल्या हृदयात वास करणाऱ्याची राधा - भावाने केलेली भक्ती. या भक्तीमध्ये जीवात्मा वधू आणि परमात्मा वर असतो. याचा देहाशी काहीही संबंध नसतो. ही जीवात्म्याची परमेश्वरासाठी असणारी तृष्णा आहे. ही आत्म्याची तृष्णा आहे तसेच परमेश्वराचे प्रेम प्राप्त करण्याची तृष्णा आहे. हे काम नाही, कामदहन आहे. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात

जय साईराम

गुरुवार, ४ ऑक्टोबर, २०१८

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

" केवळ सर्वसंगपरित्याग केल्याने मोक्षप्राप्ती होते. "  

भाग पाचवा 
प्रेम साई अवतार 

        " तुझी माझ्यावरील प्रीती सर्वांच्या हृदयात ताजमहाल निर्माण करेल." 
सत्य युगाचे बीज 
              मन, बुद्धी, इंद्रिये आणि अहंकार शुद्ध करण्यासाठी मी आत्मनिवेदन केले. स्वामींनी मला वसिष्ठ गुहेमध्ये बोलावले आणि शुद्ध सत्व स्थितीमध्ये मला त्यांच्याशी संयुक्त करून घेतले. 
              इथे जीवाची साधना समाप्त होते. तो देहत्याग करून परमेश्वरमध्ये विलिन होऊ शकतो. तथापि मी असा विचार केला की, हा देह धरतीवर का सोडायचा ? हा देहही त्यानेच दिलाय ना ? तोसुद्धा त्याला अर्पण करायला नको का ? 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम