ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आपले अस्तित्व म्हणजे जीवनभराचे एक स्वप्न आहे हे आपण जाणले पाहिजे."
सूत्र तिसरे
या हृदयीचे त्या हृदयी
" एकदा एका संध्याकाळी राधा एकटीच मथुरेला निघाली. तिला जाताना पाहून सर्व गोपिका तिच्या पाठोपाठ निघाल्या. यमुनेच्या तीरावर पोहोचेपर्यंत अंधार पडला. गोपिका राधेला म्हणाल्या, की अंधार झाला असल्यामुळे तिने मथुरेला जाऊ नये आणि तरीही तिला जाणं भागच असेल तर त्याही तिच्याबरोबर जातील. वृंदावन सर्वांचे आहे आणि गोविंदाही सर्वांचा आहे, असे भाव राधेच्या मनात होते. ती सर्वांना मथुरेला घेऊन जाण्यास राजी झाली. त्या सर्वजणी यमुनेच्या तीरावर पोहोचल्या आणि नावेत बसल्या. एकीचीच दमछाक होऊ नये म्हणून सर्वजणी आळीपाळीने नाव वल्हवू लागल्या. अंधार झाला असल्याने त्यांनी इतर कोणत्याच गोष्टीकडे विशेष लक्ष दिले नाही. त्या रात्रभर नाव वल्हवत होत्या. तरीही गंमत अशी की त्या मथुरेला पोहोचल्याच नाहीत. पहाट झाल्यावर काही जणं नदीवर येत असल्याचे त्यांनी पाहिले. अरे ! ते तर गोकुळवासी होते. रात्रभर नाव वल्हवूनही त्या गोकुळमध्येच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. निरखून पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की नदीतीरावर नावेला बांधलेला दोर त्यांनी सोडलाच नव्हता. "
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा