ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
"केवळ साधना आणि परिवर्तन याद्वारे परमेश्वर प्राप्ती होते."
सूत्र नववे
प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान
मी शेल्फमधून पुस्तक काढले ' समर शॉवर्स इन वृंदावन ' १९९६ पान नं. ८५, त्यात स्वामींनी म्हटले आहे,
" बिभीषणाला राज्याभिषेक केल्यानंतर रामाला सीता परत मिळाली. मूर्तिमंत अनुभव ज्ञान. अखेर प्रज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन झाले. प्रज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन हेच खरे ज्ञान आहे."
स्वामींनी सांगितले की, रामकृष्ण परमहंसांनी परमेश्वराच्या दर्शनाकरता किती प्रतीक्षा केली, दुःख सोसले. रोज रात्री ते आक्रोश करत," अजून एक दिवस कालीमातेच्या दर्शनाविना व्यर्थ गेला." कलकत्यामध्ये अरविंद घोष, बिपीनचंद्र पाल यांच्यासारखे अनेक महान पंडित होऊन गेले. परंतु रामकृष्णाचे नाव अजरामर झाले. सर्वांच्या अंतःकरणात कोरले गेले.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा