ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" पती, पत्नी, मुलेबाळे माता पिता आणि नातेवाईक यांच्याबरोबर निर्माण केलेल्या आसक्तीमुळे आपण ह्या जगामध्ये अनेक दुःख भोगतो व पुन्हा पुन्हा जन्म घेतो."
सूत्र नववे
प्रज्ञान आणि अनुभव ज्ञान
वसंता - स्वामी, प्रज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन म्हणजे काय?
स्वामी - प्रज्ञान सर्वांमध्ये असते. प्रत्यक्ष अनुभव घेतल्यानंतर ते अनुभवज्ञानात होते आणि उच्च ज्ञान प्रकटते.
वसंता - स्वामी, माझ्या बाबतीत काय ?
स्वामी - तू मूर्तिमंत प्रेम आहेस. प्रेमाला अनुभव लागतो. म्हणून तू लहानपणापासून परमेश्वराच्या अनुभूतीसाठी तळमळत आहेस. तुझे प्रेम सर्वत्र व्यापून राहिले आहे, म्हणून तुला प्रत्येक गोष्टीतून परमेश्वराची अनुभूती घ्यायची आहे.
वसंता - आता मला समजले, स्वामी प्रज्ञान प्रत्यक्ष अनुभव बनते.
स्वामी - ज्ञानाचे अनुभवज्ञानात परिवर्तन झाल्यांनतर अधिक फळ मिळते.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा