गुरुवार, २ जानेवारी, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार 

        " प्रत्येक गोष्टीकडे परमेश्वरी लिला या दृष्टिकोनातून पाहिल्यास तुम्हाला दिव्यानंदाची अनुभूती होईल. "

सूत्र नववे 

प्रज्ञान आणि अनुभवज्ञान

            रामकृष्णांना समकालीन असणाऱ्या कलकत्त्यातील विद्वान पंडितांबद्दलही मला स्वामींनी सांगितले. ते लोकांच्या हृदयामध्ये आपले स्थान प्रस्थापित करू शकले नाहीत. परंतु , लोक आजही रामकृष्णांना आपल्या हृदयात केवढं स्थान देतात ? काळाच्या ओघात पंडित विस्मृतीत गेले. लोकांना त्यांची आठवण राहिली नाही. परमेश्वरासाठी तळमळणारे, रडणारे महान भक्त मात्र कायमचे स्मरणात राहतात. 
            स्वामींनी प्रज्ञान आणि अनुभवज्ञान ह्या दोन्हींची तुलना केली. पंडित प्रज्ञानासारखे आहेत आणि परमेश्वरासाठी तळमळणारे भक्त हे अनुभवज्ञानासारखे आहेत. माझ्या प्रज्ञानाला स्वामींच्या आणि माझ्या नात्याचे ज्ञान आहे. स्वामींनी माझा स्वीकार केल्यानंतर ह्या ज्ञानाचे अनुभवज्ञानात म्हणजेच प्रत्यक्ष अनुभवातून निर्माण होणाऱ्या ज्ञानात परिवर्तन होईल. 
            म्हणून स्वामींनी सांगितले की, मी सात दिवस त्यांच्या सान्निध्यात असेन. त्यावेळी मला सात दिवसांत  ७० वर्षांचा अनुभव मिळेल. हा अनुभव घेताना प्रज्ञानाचे  अनुभवज्ञानात परिवर्तन होईल.  

उर्वरित प्रकरण पुढील भागात .....

जय साईराम 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा