ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" बंध म्हणजे द्वैतावस्थेत अडकलेले मन. मनामुळेच भेद उत्पन्न होतात. "
सूत्र नववे
प्रज्ञान आणि अनुभवज्ञान
वसंता - स्वामी मला प्रज्ञान आणि अनुभवज्ञान याविषयी काही सांगा ना.
स्वामी - तू अनेक उपनिषदांवर लिहिले आहेस. मुण्डक उपनिषदामध्ये तू झाडावर बसलेल्या दोन पक्ष्यांविषयी लिहिलेस. एक फळ चाखतो व दुसरा साक्षीभावाने पाहतो. फळ खाणारा सामान्य पक्षी साक्षी कसा बनतो, याचे तू प्रात्यक्षिक करून दाखवले आहेस. हे अनुभवज्ञान आहे. उच्च ज्ञानाचे लेखन म्हणजे उपनिषद. दैनंदिन जीवनात त्याचा प्रयोग करणे म्हणजे अनुभवज्ञान होय. त्यानंतर तू बृहदारण्य उपनिषदावर लिहिलेस. त्यावेळी तू विराट पुरुषाच्या अवस्थेची अनुभूती घेतलीस. वसंतमयम् च्या अनुभूतीतून तू पुरुष-प्रकृती अवस्थेविषयी लिहिलेस. आता नवनिर्मितीसाठी तू माझे सान्निध्य मागते आहेस. जेव्हा तुला माझे दर्शन, स्पर्शन आणि संभाषण लाभेल तेव्हा सर्व काही ठीक होईल.
ध्यान समाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा