ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" प्रत्येक गोष्ट परमेश्वराशी जोडा. सर्वांमध्ये केवळ चांगले पाहिल्यास त्यांची चैतन्य शक्ती तुमच्या मधे प्रवाहित होईल. "
सूत्र नववे
प्रज्ञान आणि अनुभवज्ञान
स्वामी - तू अशी का रडते आहेस ? असे लेखन का करते आहेस ? मला आता तुझे दुःख सहन होत नाही. हे प्रेमसूत्र आता पुरे झाले !आता थांबव ! आनंदी राहा. लवकरच आपण एकमेकांना पाहू.
वसंता - स्वामी मला तुमचे दर्शन हवे आहे.
संध्याकाळचे ध्यान
वसंता - स्वामी, प्रेमसूत्र पुरे करू का ?
स्वामी -
तुझ्या प्रेमाचे वर्णन कसे करावे !
प्रेमाची व्याख्या झालीस तू
महाकाव्य प्रेमाचे निर्मिलेस तू
प्रेमाकरिता निर्मिलेस तू नूतन जग
प्रेमाकरिता निर्मिलीस नवनिर्मिती
हे प्रेम आहे अभूतपूर्व
पुरे ! पुरे, हे असह्य होतसे मज
ब्रम्हसूत्र लिहू शकतो केवळ ब्रम्हदेव
कोण लिहू शकते प्रेमसूत्र, केवळ तूच
पुरे ! पुरे, थांबव !
लिहिण्यास मी सांगितले तर ...
हृदय पिळवटून टाकीत तुझे तू
लिहीतच जाशील, लिहीतच जाशील
दुःख तुझे दुःसह होई मज
पंचशत अवतार घेतले जरी मी
तव प्रेमाचा होऊ कसा उतराई
पुरे ! पुरे, थांबव !
नको वाढवूस माझी अवतार संख्या
पुरे .... सीता अग्निप्रवेश करत असता, अग्नी तिचे पावित्र्य सहन करू शकला नाही. मी तुझा अग्निप्रवेश सहन करू शकत नाही. तुझ्या पावित्र्याचा अग्नी मला भाजून काढतो आहे.
वसंता - स्वामी, मी उपसंहार म्हणून हे लिहू का ?
स्वामी - लिही, परंतु तुझ्या प्रेमाला ना प्रस्तावना आहे ना उपसंहार.
ध्यानसमाप्ती
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा