ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" परमेश्वरावर भक्तिचा वर्षाव करण्याचे नानाविध मार्ग तुम्ही शोधू शकता. "
सूत्र नववे
प्रज्ञान आणि अनुभवज्ञान
जरी मी स्वामींच्या या रूपावर प्रेम करत असले तरी ते सर्वव्यापी परमेश्वर आहेत. वसंतमयमद्वारे मलाही सर्वव्यापी बनून त्या सर्वव्यापी स्वामींना प्राप्त करून घ्यायचे आहे. म्हणून तो सर्वव्यापी परमेश्वर माझ्या भावनांना प्रतिसाद देतो आहे.
पांडुरंगाच्या मूर्तीला स्पर्श केल्यानंतर माझ्या मनात भावनांचा कल्लोळ झाला. मी आता केवळ यासाठी रडते की, मला मुक्ती नको, पावित्र्य नको, मला फक्त स्वामींचे सान्निध्य हवे. माझा हा आक्रोश ऐकून लगेच कृष्णही अश्रू ढाळतो. रखुमाईचे दुःख आणि अश्रू सहन न होऊन, तोच पांडुरंग आज अश्रू ढाळत आहे. यातून आम्ही कोण आहोत, आमच्यामधील नाते काय आहे हे सर्व उघड होत आहे.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा