ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प पंचवीस
त्याग भाव
न कर्मणा न प्रजया धनेन त्यागेनौके अमृतत्व मानुशः
कठोपनिषदात विश्वजीत यज्ञाविषयी असे म्हटले आहे जर एखाद्याला सर्व प्राप्त करायचे असेल तर प्रथम त्याने सर्वस्व त्यागले पाहिजे. ' सर्व प्राप्त ' म्हणजे काय ? त्याचा अर्थ मुक्ती. मुक्ती म्हणजे सर्वस्व. अमरत्व प्राप्त करण्यासाठी सर्व काही सोडून दिले पाहिजे.
जेव्हा आपण एखाद्याला आपली मौल्यवान वस्तू दुसऱ्याला भेट देतो तेव्हा त्यातून आपल्याला केवढा आनंद मिळतो. मुलांच्या कल्याणासाठी आईने अंगावर घेतलेली त्यांची दुःख ! जेव्हा एखादी व्यक्ती दुसऱ्याची दुःख, त्रास आपल्यावर घेतो तेव्हा त्या व्यक्तीला मिळणारा आनंद व समाधान वेगळेच असते व पूर्वी कधीही न अनुभवलेले असते.
छोट्या छोट्या गोष्टींचा त्याग करा आणि पाहा तुम्हाला त्यातून केवढा आंनद मिळतो.
धन, पद, प्रतिष्ठा, लोकप्रियता, कुटुंब, नावलौकिक, नातीगोती हे सर्व क्षणभंगुर आहे, अशाश्वत आहे. ह्या जगामध्ये केवळ त्याग शाश्वत आहे कारण तो आपल्याला शाश्वत अवस्था प्रदान करतो. केवळ त्यागाद्वारे आपल्याला अमरत्व प्राप्त होते. त्यागाद्वारेच आपल्याला परमेश्वरप्राप्ती होते. श्रीकृष्णाने भगवद् गीतेतील १२ व्या अध्यायातील १२ व्या श्लोकात हेच सांगितले आहे.
श्रेयो हि ज्ञानमभ्यासाज्ज्ञानाध्द्यानं विशिष्यते |
ध्यानात्कर्मफलत्यागसत्यागाच्छान्तिरनन्तरम ||
त्यागभाव कसा उत्पन्न होतो ?
केवळ वैराग्याने त्यागभाव उत्पन्न होतो मनुष्याची वैराग्य वृत्ती असायला हवी. केवळ परमेश्वर सत्य आहे आणि बाकी मिथ्या ह्या भावामध्ये जो दृढतेने स्थित आहे त्याच्या मनामध्ये आपोआपच वैराग्य भाव येतो आपण स्वतःला मायेमधून मुक्त केले पाहिजे. सर्वस्व त्यागले पाहिजे.
संदर्भ - श्री वसंतसाईंच्या ' The Principle of Becoming God ' ह्या पुस्तकातून.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा