गुरुवार, १२ मार्च, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः 

सुविचार

        " आपल्या मार्गात अनेक अडथळे आले तरी आपण आपला धर्म (स्वधर्म), सदाचरण याच्याशी निष्ठावंत राहिले पाहिजे. " 

भाग आठवा 

' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये

मला पैसा आणि दागिने यांची भीती वाटते. 

           लहानपणापासूनच मला माझ्याजवळ पैसे बाळगायची सवय नाही. कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त मी जर कधी कोणाबरोबर गावाला गेले तर माझ्या खर्चाचे पैसे मी त्यांच्याजवळ ठेवायला देत असे. ते खर्च करत असत. मी कधीही माझ्याजवळ पैसे व पर्स ठेवली नाही. जर कोणी मला दागिने दिले तरी मला भीती वाटते. माझ्या विवाहप्रसंगी माझ्या बहिणींनी मला अनेक रत्नजडित अलंकारांनी सजवले होते. मी माझ्या आजीजवळ रडले आणि म्हणाले, " त्यांनी मला एखाद्या सिनेकलावंतासारखे नटवले आहे. मला हे नको आहे. खरच नको आहे. " मी रडून त्यांना ते सर्व उतरविण्यास सांगितले. कोणीही स्त्री असे सांगेल का त्यानंतर स्वामींनी मला नवरत्नांचे दागिने करून घालण्यास सांगितले. मी म्हणाले, " स्वामी, मला यांचे ओझे होते. जेव्हा तुम्ही मला बोलवाल तेव्हा ते सर्व मी तुमच्या चरणकमलांवर अर्पित करेन."

मला उंची साड्यांची भीती वाटते 

             मला अनेक लोक उंची साड्या देतात. त्या मी नेसत नाही व इतरांना भेट देऊन टाकते. बालपणापासूनच मी नेहमी खादीची वस्त्रे वापरत असे. त्यांनतर मी ३० रु. किंमतीच्या साड्या वापरू लागले. मला या चैनीच्या वस्तू पहायची भीती वाटते. 

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा