रविवार, २९ मार्च, २०२०

ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः

सुविचार

             " प्रज्ञान म्हणजे अंतर्ज्ञान, हे परमज्ञान आपल्या प्रत्येकामध्ये आहे. "

भाग - आठवा 

' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये 

             परमेश्वर आणि त्याची निर्मिती एक सत्य आहे. तथापि असे म्हटले जाते की, जग माया आहे. या छोट्या ' मी ' चे चर्मचक्षू मायेने झाकलेले जग पाहतात. जर एखाद्याला ' मी ' नसेल तर तो सर्व काही ज्ञानचक्षूंनीच पाहील. त्याला सत्याशिवाय दुसरे काही दिसणार नाही, ज्यांना ' मी ' आहे, ते जगाकडे केवळ चर्मचक्षूंनीच पाहतात. त्यांना सत्य कधीच दिसत नाही. जर तुम्ही चर्मचक्षूंनी देहधारी परमेश्वराला पाहिले तर तुम्हाला तो सामान्य मनुष्यासारखा भासतो. जर एखाद्याने अवताराकडे अशा दृष्टीने पाहिले तर त्याला जगं कस दिसेल ? जगामध्ये त्याला केवळ मत्सर, मतभेद आणि वैरभाव दिसेल जे मनामध्ये असते ते बाहेर दिसते. ' मी आणि माझे ' हेच याचे कारण आहे. जर एखाद्याच्या मनी ' मी आणि माझे ' नसेल तर त्याला परमेश्वर हेच सत्य आणि जग हेच सत्य आहे याची जाणीव होईल आणि म्हणूनच हा ' मी विना मी ' - निर्माता आणि निर्मिती यांना एक पाहतो. 

*     *     *

उर्वरित प्रकरण पुढील भागात ..... 

जय साईराम   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा