ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" एखाद्याच्या जन्मापासून मृत्युपर्यंत उमटलेले भावच मनावर उमटलेले दीर्घ ठसे बनतात. "
भाग - आठवा
' मी विना मी ' चे गुणवैशिष्ट्ये
आई तिच्या बाळासमोर उभी आहे परंतु, तिने बाळाला उचलून घ्यायचे नाही, असे तिला सांगण्यात आले आहे. ते बाळ आईला पाहून रडू लागते. ते आईच्या प्रेमासाठी, वात्सल्यासाठी, तिच्या स्पर्शासाठी रडते आहे. कोणीतरी त्या बाळाला म्हणते, ' तुला तुझ्या आईपाशी जाता येणार नाही. ' ते त्याच्यासमोर खेळणी, बाहुल्या ठेवतात. त्याला फळे व बिस्कीट खायला देतात. या सर्वांनी त्या मुलाचे समाधान कसे होईल ? त्याला रांगत रांगत त्याच्या आईजवळ जायचे आहे. माझी अवस्था त्या बाळासारखी आहे. ब्रम्हावस्था, हा आश्रम, हा स्तूप, शिवावस्था, शक्ती अवस्था हे सर्व म्हणजे माझ्यासमोर ठेवलेल्या बाहुल्या व खाऊ आहे.
स्वामी म्हणतात,
तुला कोणीही बदलू शकणार नाही. तू इथे शिकण्यासाठी वा शिकवण्यासाठी आलेली नाहीस. तू मूलभूत अवस्थेत, अस्तित्व अवस्थेत आहेस. तू जशी आहेस तशीच आहेस. तुझ्या पहिल्या पुस्तकात तू माझी शक्ती असल्याचे मी दर्शवले आहे. लोक तुझ्यावर विश्वास ठेवोत वा न ठेवोत तुझे भाव जगामध्ये जाऊन सर्वांना बदलतील. ही तुझी अवस्था आहे."
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा