ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" आत्मा म्हणजे काय ? ते शुद्ध चैतन्य आहे. जो अविनाशी, अजन्मा, अमर आहे. "
भाग - आठवा
' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये
मी सर्व आत्मसाक्षात्कारी जीवांहून वेगळी आहे. मला परमेश्वर आणि जग दोन्ही हवे आहे. मला द्वैत हवे आहे. का ? कारण मला जगातील सर्वांचे परिवर्तन घडवून त्यांना माझ्यासारखे बनवायचे आहे. जर मी समाधी-अवस्थेत राहिले, तर इतर संतमाहात्म्यांसारखी मलाही मोक्षप्राप्ती होईल. संपूर्ण जगाला मुक्ती मिळावी अशी माझी इच्छा आहे. सर्वांनी मुक्तीचा अनुभव घ्यावा. इतरांच्यात आणि माझ्यात हा फरक आहे. ईशावस्थेसह सर्व उच्च अवस्था या समाधी अवस्थेसारख्या आहेत. जर मी परमेश्वर झाले तर जगाच्या कर्मांचा संहार कसा करणार ? सर्वांना मुक्ती कशी देणार ? माझ्या हातामध्ये कर्माचा तराजू येईल आणि मी साक्षी अवस्थेत असल्याने कोणासाठीही काही करू शकणार नाही, हे मला नको आहे.
* * *
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा