ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" अनासक्त जीवन जगणे म्हणजेच मुक्ती होय."
भाग -आठवा
' मी विना मी ' ची गुणवैशिष्ट्ये
मला नवीन औषधांचीही भीती वाटते.
मला सतत शिंका येतात व त्वचेला कंड सुटते. मला कोणते औषध लागू पडेल ? होमिओपथिक, नेचरोपथिक, Allopathy का आयुर्वेदिक ... माझा देह यांपैकी कशाचाच स्वीकार करणार नाही. माझ्यासाठी ' साईपथी ' हे एकमेव औषध आहे. त्यांचे चिंतन हेच माझे औषध आहे.
मला आजारांची भीती वाटते.
किरकोळ आजार झाला तरी मला भीती वाटते की , त्याने माझे लक्ष देहाकडे वळेल आणि तो आजार ईशचिंतन करणारे माझे मन व्यापून टाकेल.
मला झोपेची भीती वाटते.
मला झोपेची भीती वाटते. मी नेहमी स्वामींना रडून रडून सांगते," मला झोप नको आहे. मला झोप नको आहे." मी जर झोपले तर मला परमेश्वराचे विस्मरण होईल अशी मला भीती वाटते. मला जर एखादे नवीन औषध लिहून दिले तर ते घेण्यापूर्वी " याने मला ग्लानी तर येणार नाही ना ?" असे मी विचारते. एका क्षणासाठीही मला स्वामींचे विस्मरण होऊ द्यायचे नाहीये. झोप म्हणजे वेळेचा अपव्यय असे मला वाटते.
* * *
उर्वरित प्रकरण पुढील भागात.....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा