ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
पुष्प -३०
कर्माची अदृश्य मुळे
ही स्वामींच्या आणि माझ्यापासून जन्माला आलेली वंशावळ एक हजार वर्ष चालू राहील. या वंशावळीत सर्व पुरुष ' सत्य ' आणि सर्व स्त्रिया ' प्रेम ' असतील. सर्व मुले ' ज्ञान ' असतील. हे कलियुगातील एक सत्ययुग असेल. एक हजार वर्षांच्या शेवटी सर्वांना पुन्हा आपआपली कर्म भोगायला लागतील. ते सत्ययुगात अनेक जन्म घेतील. परंतु त्यांना या काळात त्यांची कर्म भोगावी लागणार नाहीत. १००० वर्षाच्या सत्ययुगानंतर जेव्हा पुन्हा कली येईल, तेव्हा उर्वरित कर्म त्यांची वाट पहात असतील.
तुम्ही कदाचित म्हणाल, " अरेच्या ! सत्ययुग हे एवढच असेल ? तुम्ही तर म्हणालात की सर्वांना मुक्ती मिळेल. आता तुम्ही म्हणता, कर्म तशीच राहतील. हे काय गौडबंगाल आहे ?"
स्वामींनी ध्यानात कर्माच्या कायद्याच सत्य सांगितल्यावर माझ्याही मनात अगदी हाच विचार आला. आजपर्यंत जगापुढे उघड न केलेली सूक्ष्मातील सूक्ष्म सत्ये उघड करण्यासाठीच हा अवतार धरतीवर अवताराला आहे.
स्वामींचे आणि माझे भाव सृष्टीत सर्वांमध्ये प्रवेश करतात आणि अवकाशातील प्रदूषण दूर करतात. आमचे भाव अवकाश व्यापून पंचमहाभूते शुद्ध करतात. १००० वर्षे सर्वजण याचा अनुभव घेतील व आनंद उपभोगतील. १००० वर्षांच्या सत्ययुगाच्या शेवटी माणूस पुन्हा जन्म घेईल आणि कलियुगातील त्याची उरलेली कर्म भोगायला लागेल. जर असे असेल तर मग जन्ममृत्युच्या चक्रातून सुटका मिळवण्यासाठी उपाय तरी काय ?
स्वामींनी त्याच्या पदवीदान दिनाच्या प्रवचनात सांगितले की २८ वर्षांनंतर संपूर्ण जग एक होईल. हेच सत्ययुग असेल, याचा अर्थ असा की सर्वांना त्यांचे पूर्णपणे परिवर्तन होण्यासाठी २८ वर्षांचा कालावधी दिला आहे. प्रयेक मिनिटाला आपण आपल्या विचारांवर लक्ष ठेवून ते परमेश्वराकडे वळवले पाहिजेत.
हा कर्माचा हिशोब सत्ययुगात वाढणारही नाही अथवा कमीही होणार नाही. संपूर्ण युग हे निरामय आनंदाची स्थिती असेल. सत्ययुगात घेतलेल्या अनेक जन्मात रामाची निरनिराळी नावे व रूपे असतील. परंतु त्याच्या कर्माचा काटा सत्ययुगाच्या शेवटी त्याची वाट पहात असेल. हजार वर्षांनी येणारे कलियुग त्याच्या कर्मानुसार येणाऱ्या जन्ममृत्युचे कारण असेल; आणि ते कलियुग सध्याच्या कलियुगाहून कितीतरी पटीने भयावह असेल; सर्वात वाईट कली.
मग आपण २८ वर्षे काय करावे ? आपण आपली स्तिथी समजून घेऊन स्वतःचे संपूर्णपणे परिवर्तन करावे. फक्त हाच एक उपाय आहे.
संदर्भ - वसंतसाईंच्या ' सत्ययुग आणि कर्मकायदा ' ह्या पुस्तकातून.
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा