ॐ श्री साई वसंतसाईसाय नमः
सुविचार
" ईश्वर प्रेम आहे, ह्या प्रेमाची अभिव्यक्ती हा मानवधर्म आहे. "
भाग - नववा
आत्मगीते
हे वासुदेवा, ज्ञान नाही त्यासी राजनीतीचे
जाणितो केवळ तो रासलीला
अनुसरण न करी तो आपुल्या संस्कृतीचे
चित्तचोर तो, चोरीले माझे हृदय त्याने
त्याच्या दासाची ही दशा
मान्य होईल का जगा ?
ना सत्य इथे ना प्रेम
मुक्त कधी करणार मला तो, मुक्त कधी करणार?
या कवितेमध्ये मी वसुदेवाकडे त्याच्या पुत्राची तक्रार करते आहे. त्याला राजनीती शिकवली नाही. त्याला फक्त गोपगोपींबरोबरची रासलीला माहीत आहे. मी असेही सांगितले की, जिने आपले हृदय परमेश्वराला अर्पण करून गमावले आहे अशा दासीचा जग स्वीकार करणार नाही. मला हे असत्याचे व निष्प्रेम जीवन नको होते.
या कवितेच्या धर्तीवर मी श्री रंगनाथावर १०० कविता लिहिल्या. त्यांतल्या बहुतांशी कविता यशोदा, नंद आणि वसुदेव यांना उद्देशून लिहिल्या आहेत.
उर्वरित प्रकरण पुढील भागात .....
जय साईराम
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा